5 February 2023 9:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, रविवारी खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा My Salary Slip | पगारदार व्यक्ती आहात? तुमच्या पगाराच्या स्लिपमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो माहिती आहे? लक्षात ठेवा Vodafone Idea Share Price | भारत सरकार 'व्होडाफोन आयडिया' मध्ये सर्वात मोठी गुंतवणुकदार, शेअरचं पुढे काय होणार? Horoscope Today | 05 फेब्रुवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Paytm Share Price | पेटीएम शेअरमध्ये पडझड, कंपनी प्रोफीटेबल होईल? गुंतवणूकदारांनी काय करावे? Stocks To Buy | अल्पावधीत पैसे कमावण्यासाठी तज्ञांनी 4 स्टॉक निवडले, पैस्टॉक डिटेलसह टार्गेट प्राईस तपासा Numerology Horoscope | 05 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या
x

मुंबई व चंद्र; फरक इतकाच की मुंबईत जीवश्रुष्टी आढळते पण चंद्रावर अजून तरी नाही

मुंबई : भूगोलाच्या पुस्तकात प्रत्येकाने पाहिलं असावं की चंद्राचा भूपृष्ठ भाग असा दिसतो आणि चंद्रावरबाबत अजून संशोधन सुरु असल तरी तिथे मनुष्याची किव्हा पृथ्वीप्रमाणे इतर पशु पक्षांची जीवश्रुष्टी अस्तीत्वात नाही. परंतु एकाच पावसाने मुंबईमधील रस्त्यांची दुर्दशा आणि खड्ड्यांच प्रमाण पाहिल्यास सध्या चंद्रावरून सुद्धा मुंबई चंद्रासारखीच दिसत असावी असा भौगोलिक तर्क लढविला गेल्यास आश्चर्य वाटायला नको.

खड्डेयुक्त मुंबई आणि चंद्र यामध्ये सध्या एकच फरक आहे की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवश्रुष्टी आहे, जी रोज ह्या शहरातील खड्ड्यांमधून जीव मुठीत घेऊन प्रवास करते आणि त्यातील अनेक जण स्वतःचा जीव सुद्धा गमवून बसतात. दुसरीकडे चंद्रावर खड्डे असले तरी तिथे जीवश्रुष्टीच अस्तित्वात नसल्याने साहजिकच तिथे निवडणुका होत नाहीत, निवडणूका होत नसल्याने चंद्रावर कोणीही सत्ताधारी नाहीत आणि सत्ताधारी नसल्याने अर्थातच प्रशासन सुद्धा नसणार आणि हे सर्वजण नसल्याने साहजिकच ‘भष्टाचार’ सुद्धा नसणार आणि त्यामुळे तिथे अस्तीत्वात असलेले “खड्डे” हे विश्वातील कोणताही प्राणी, मनुष्य आणि शास्त्रज्ञ मनापासून स्वीकारेल.

अरे! परंतु मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवश्रुष्टी अस्तित्वात आहे. इथे निवडणुका सुद्धा होतात आणि त्यामुळे सत्ताधारी सुद्धा आहेत. सत्ताधारी असल्याने अर्थात प्रशासन सुद्धा आलाच आणि सत्ताधारी-प्रशासन आलं म्हणजे मिलीभगतवाला ‘भ्रष्टाचार’ सुद्धा आला. त्यामुळे चंद्रावरील खड्डे जसे स्वीकार्य आहे तसं मुंबई शहराबद्दल का म्हणावं? कदाचित या शहरात अस्तित्त्वात असलेले ‘सत्ताधारी व भ्रष्ट प्रशासन’ आणि ‘कंत्राटदार’ आणि त्यांचे प्रियजन हे कदाचित या मुंबईशहरातील जीवश्रुष्टीचा भाग नसावेत. त्यामुळे या मुंबईमध्ये याच रस्त्यावरून प्रवासादरम्यान खड्ड्यात अडकून कोणी ही मरूदे किव्हा लुळा पांगळा होऊन जाऊ दे, त्यांना नाही कळायचं.

हॅशटॅग्स

#Shivsena(1169)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x