12 December 2024 11:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त Samvardhana Motherson Share Price | संवर्धना मदरसन सहित हे 4 शेअर्स 45% पर्यंत परतावा देतील, फायदा घ्या - NSE: MOTHERSON Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या
x

पार्थ पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता | आजोबांचं वक्तव्य जिव्हारी लागलं

Parth Pawar, unhappy, Sharad Pawar

मुंबई, १३ ऑगस्ट – शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार प्रचंड दुखावले गेले आहेत. पार्थ पवार हे लवकरच मोठा निर्णय घ्यायच्या तयारीत आहेत, अशी माहिती पार्थ पवार यांच्या जवळच्या सूत्रांनी दिली आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. यानंतर पार्थ पवार कमालीचे नाराज झाले आहेत.

राष्ट्रवादीकडून लकसभा निवडणूक लढलेल्या आणि निवड समितीत काम केलेल्या युवा नेत्याला अपरीपक्व म्हटल्यामुळे पार्थ नाराज असल्याची माहिती समर्थकांकडून दिली जात आहे. अजित पवारांन मोठ्या आत्मविश्वासाने पार्थ यांना लोकसभा निवडणुकीच्या काळात लाँच केलं होतं. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला त्यानंतरही राष्ट्रवादीत वादळ निर्माण झालं होतं. विधानसभा निवडणकीनंतर अजित पवारांनी बंड केलं होतं. त्यामुळे पार्थ पवार कुठला निर्णय घेतात याकडे आता राजकीय निरिक्षकांचं लक्ष लागलं आहे.

पार्थ पवार यांचा मोठा निर्णय काय असणार? पार्थ राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार का? पार्थ दुसऱ्या पक्षात जाणार का राजकारणापासून अलिप्त राहणार? पार्थ पवार यांच्या निर्णयामुळे अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढणार आहेत. तसंच पार्थ पवार यांनी मोठा निर्णय घ्यायचं ठरवलं तर अजित पवार काय भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पवार कुटुंबासाठी मात्र हा मोठा धक्का असणार आहे.

 

News English Summary: Ajit Pawar’s son Partha Pawar has been hurt due to the statement made by Sharad Pawar. Sources close to Partha Pawar said that he is ready to take a big decision soon.

News English Title: Parth Pawar unhappy with Sharad Pawar statement could take big decision News latest Updates.

हॅशटॅग्स

#ParthPawar(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x