27 April 2024 12:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

...आता फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे - कुणाल कामरा

Devendra Fadnavis, CM of Maharashtra, Kunal Kamra

मुंबई, २४ मार्च: राज्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजकीय व्यक्तींप्रमाणे सुरु असलेल्या हालचाली आणि कृत्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री हेच यामागील करविते असल्याचा आरोप सत्ताधारी करत आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात वातावरण निर्माण करताना भाजपने आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेविरुद्ध टोकाच्या भूमिका घेतल्याने शिवसेनेत संताप आहे.

त्यात भाजपमधीलच काही नेते मॅनेज करून त्यांच्या करवी राजकारण करून उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना देखील वादात ओढलं जातं असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल सेनेत प्रचंड रोष निर्माण झाल्याचं वृत्त आहे. मात्र राष्ट्रवादीच्या बाबतीत भविष्यात आशावादी असलेल्या भाजपने त्यांना देखील सचिन वाझे प्रकरणात लक्ष करताना टोकाची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील आमदार फुटणार नाहीत आणि फुटले तर त्यांना तिन्ही पक्षांविरोधात निवडून आणणं शक्य होणार नसल्याने भाजपने राज्य प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांशी अघोषित हातमिळवणी केल्याचं म्हटलं जातंय. त्यातही महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस याच पक्षांनी बदनाम केले अशी बोंबाबोंब देखील सुरु केल्याने शिवसेनेत संताप टोकाला गेला आहे. त्यामुळे भविष्यात भाजपचं राजकारण कठीण होणार आहे असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना भाजपसोबत गेल्यास फडणवीसांना दूर ठेवण्याचीच अट घालतील अशी शक्यता वर्तविण्यात येतं आहे. त्यात कुणाल कामराने केलेल्या ट्विटमुळे ते राजकीय लोकांच्या व्यतिरिक्त इतरांच्या देखील ध्यानात आलं आहे असं म्हणता येईल.

राज्यातील राजकीय घडामोडी पाहून या संदर्भात ट्विट करताना कुणाल कामरा याने म्हटलं आहे की, “त्या मृत्यूनंतर नेमकं काय घडतंय याबद्दल मी निश्चित नाही, काळाचा घाला पुढे नेमकं काय घेऊन येईल याचीहि मला खात्री नाही, उद्या काय समोर येणार यांची देखील कल्पना नाही….पण देवेंद्र फडणवीस पुन्हा कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे.

 

News English Summary: Not sure about what happens after death, Not sure how the concept of time will evolve further, Not sure if tomorrow ever really comes but I’m sure Devendra Fadnavis will never become the Chief Minister of Maharashtra Again said Kunal Kamra news updates.

News English Title: Devendra Fadnavis will never become the CM of Maharashtra Again said Kunal Kamra news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)#KunalKamra(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x