20 April 2024 9:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 21 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Godawari Power Share Price | अवघ्या 3 वर्षात 339% परतावा देणाऱ्या शेअरची पुढची टार्गेट प्राइस जाहीर, वेळीच फायदा घ्या Jubilant Pharmova Share Price | अल्पावधीत करा मोठी कमाई! हा शेअर देईल 70 टक्के परतावा, तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स पुन्हा बुलेट ट्रेन तेजीत वाढणार, कंपनीकडून आली फायद्याची अपडेट Multibagger Stocks | असा स्वस्त शेअर निवडा! किंमत 32 रुपये, अल्पावधीत दिला 2500 टक्के परतावा, खरेदी करणार? Stocks To Buy | बँक FD किती वार्षिक व्याज देईल? पण या बँकेचा शेअर अल्पावधीत 35 टक्के परतावा देईल Jio Financial Services Share Price | जिओ फायनान्शियल शेअरमध्ये चढ-उतार, स्टॉक पुढे तेजीत वाढणार की घसरणार?
x

कंगनासोबत विमानात एवढे पत्रकार | सोशल डिस्टन्सिंग धाब्यावर | DGCA'ने अहवाल मागवला

Kangana Ranaut, flight DGCA, Indigo Airlines, Marathi News ABP Maza

नवी दिल्ली, ११ सप्टेंबर : ९ सप्टेंबर हा इंडिगो एअरलाइन्ससाठी एक व्यस्त दिवस होता, कारण कोरोना महामारीनंतर पहिल्यांदा विमान उड्डाण घेणार होते. तसेच याच विमानातून पद्मश्री कंगना रनौतही चंदीगडहून मुंबईला प्रवास करणार होती. तर या विमानाने उड्डाण घेतले आणि मीडियाने कंगनाचा पाठलाग करायला सुरुवात केली. या उड्डाणादरम्यान विमानात अनेक मिडियाचे लोक होते. या लोकांच्यामुळे विमानात माजलेल्या गोंधळाचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता Directorate General of Civil Aviation ने घडलेल्या प्रकाराबाबत इंडिगोकडे जाब मागितला आहे. या व्हिडिओंमधून दिसत आहे की, फ्लाईटमध्ये अनेक मीडिया संस्थांचे कर्मचारी हजर आहेत व ते कशाचाही विचार न करता त्यांचे रिपोर्टिंग करत आहेत.

९ सप्टेंबरला अभिनेत्री कंगना रनौत चंडीगडहून मुंबईत इंडिगोच्या विमानातून आली. यादरम्यान, उड्डाणादरम्यान व्हिडीओग्राफी आणि छायाचित्रण केले गेल्याचे पुढे आले आहे. आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडो एअरलाइन्सकडून याबाबत अहवाल मागविला आहे. विमानात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग नियमाचे उल्लंघनाबाबतही अहवाल मागविण्यात आला आहे.

डीजीसीएमच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही असे काही व्हिडिओ पाहिले आहेत ज्यात मीडियाचे कर्मचारी 6E264 विमानात बुधवारी एकमेकांच्या अगदी जवळ होते. हे सुरक्षा आणि सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आम्ही ‘इंडिगो’ या विमान कंपनीला या घटनेचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.”

डीजीसीएमच्या दुसर्‍या अधिकाऱ्यानेही या घटनेसंदर्भात एअरलाइन्स कंपनीकडून अहवाल मागविला गेला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी चंदीगड-मुंबई उड्डाण दरम्यान कंगना रनौत पुढच्या रांगेत बसली होती. त्यावेळी अनेक मीडियाचे लोक विमानात होते.

 

News English Summary: IndiGo Airlines responded to a notice sent by the Directorate General of Civil Aviation (DGCA) over the media frenzy seen onboard the Chandigarh-Mumbai flight in which actress Kangana Ranaut was present. The carrier, in a statement issued on Friday, said it informed the aviation regulator that all norms were duly followed from its end. Kunal Kamra’s Flying Ban Reduced to 3 Months by IndiGo Airlines.

News English Title: Kangana Ranaut flight DGCA seeks report from Indigo Airlines on photography and video shooting Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

Bollywood(88)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x