10 August 2020 7:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कोरोनाचे संकट संपताच महाराष्ट्रात भाजपचे सरकार येईल, कर्नाटकच्या मंत्री शशिकला जोल्ले अमेरिकेत शाळा उघडल्या | ९७ हजार मुलांना कोरोनाची लागण | जुलैमध्ये २५ मुलांचा मृत्यू युरोपियन देशांप्रमाणे मुंबईत आवाजाचा नुमना घेऊन कोविड -19 टेस्ट करण्याचा प्रयोग नाणार प्रकल्प | गुलाबराव पाटील यांची खासदार नारायण राणे यांच्यावर बोचरी टीका सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंविरोधात पुन्हा ट्विटरवर जोरदार अभियान | हजारो ट्विट्स राज्यात भाजपचं सरकार आल्यावर आपला उदय झाला, तत्पूर्वीचे आपले महान कार्य राज्यापुढे नाही भाजपच्या पाठिंब्यावर उभ्या राहिलेल्या वृत्तवाहिनीतून सुशांत प्रकरणात आघाडी उघडली
x

मुंबई दादर'मध्ये येताच भाजपचे प्रवक्ते संबित पात्रां'च्या पायातले शूज हातात

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आज मुंबईमध्ये आहेत. मुंबईमधील पावसाने भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रां’वर नियोजित पत्रकार परिषद रद्द करण्याची वेळ आली आहे. परंतु पत्रकार परिषद रद्द झाल्यावर बाहेर पडलेल्या संबित पात्रांना पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे चालणे कदाचित इतके अवघड होऊन बसले की त्यांना पायातले शूज हातात घेऊन रस्ता शोधण्याची वेळ आली.

महाराष्ट्रनामा अँप डाउनलोड - कोविड - १९ डॅशबोर्ड

त्यांच्याबरोबर भाजपचे राज्यातील प्रवक्ते केशव उपाध्ये हे सुद्धा पाण्यातून वाट काढत होते. नेहमी पत्रकार परिषदेत विरोधकांना सडेतोड उत्तर देणारे हे प्रवक्ते आज मात्र निसर्गापुढे हतबल होऊन शांत पणे वाट काढताना दिसले. पण या अनुभवातून भाजप मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत किती भक्कम पायाभूत सुविधा मुंबईकरांना पुरवत आहे याचा त्यांना प्रत्यय आला असावा.

या पुढे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्र हे त्यांचा मुंबईतील पावसाच्या सफारीचा अनुभव एखाद्या पत्रकार परिषदेत नक्कीच इतरांना सांगतील यात काहीच शंका नाही. भाजप मुंबई महापालिकेत शिवसेनेसोबत भागीदार असल्यामुळे, त्यांनी जर हा अनुभव ट्विटर’वर शेअर केल्यास त्यांना संपूर्ण शहर ट्रोल करेल यात काहीच शंका नाही.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

BJP(416)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x