23 November 2019 8:09 AM
अँप डाउनलोड

राज ठाकरे बीडला सुमंत धस यांच्या कार्यालयाच्या उदघाटनाला आले होते, पण तोबा गर्दीने संवादाच थेट सभेत रूपांतर

बीड : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बीडच्या दौऱ्यावर असून कार्यकर्त्यांशी संवाद तसेच पदाधिकारी मेळाव्यांवर त्यांचा विशेष भर आहे. परंतु बीडच्या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे बीड’चे जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांच्या केज तालुक्यातील नवीन जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यासाठी आले असता, त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

परंतु जनसंपर्क कार्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची इतकी तोबा गर्दी झाली की संवाद कार्यक्रमाचे रूपांतर थेट जाहीर सभेप्रमाणे झाले. बीडमधील कार्यकत्यांनी तसेच स्थानिक तरुणांनी राज ठाकरे येणार म्हणून, त्यांना ऐकण्यासाठी संपूर्ण मैदान आधीच व्यापून टाकलं होत. वास्तविक सुमंत धस यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटना व्यतिरिक्त केजमधील स्थानिक गरजू महिलांना ‘हात शिलाई मशीन’ वाटप करण्याचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, जनसंपर्क कार्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी लोटल्याने राज ठाकरे यांनी सुद्धा कार्यकर्ते आणि स्थानिक तरुणांना संबोधित केले. या संवादाला स्थानिकांची जमलेली गर्दी एखाद्या पक्षाच्या जाहीर सभेला सुद्धा लाजवेल अशी होती. परंतु स्थानिकांचा प्रतिसाद पाहून मनसे कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना सुद्धा उत्साह संचारला असून, ते अधिक ताकदीने पक्षकार्यात उतरतील अशी शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(478)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या