14 December 2024 3:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

शिंदेंचं बंड भाजपने का घडवलं? | ही आकडेवारी सर्व स्पष्ट करते | म्हणून भाजपने शिंदेंना राष्ट्रवादीविरोधात स्क्रिप्ट दिली

Eknath Shinde

Shivsena NCP Alliance | राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस ठपका ठेवत शिवसेना आमदारांनी बंड केलं. त्यामुळे यापुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतच पुन्हा एकदा शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल अनुकूलता दर्शवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यातील प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत बोलताना शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेण्याबद्दल भूमिका मांडली आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढणारी जवळीक भविष्यातील राजकारणाचे संकेत देताना दिसत होती. राज्यातील एकूणच बदलत्या राजकारणाचा विचार केल्यास भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविल्यास आश्चर्य वाटणार नाही असं राजकीय विश्लेषकांना वाटतं होतं.

महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी एकमेकांना पूरक असल्याचं पहिल्यापासूनच स्पष्ट दिसत होतं. केवळ शरद पवार यांनी तसे अधिकृत संकेत दिले आहेत. २०२४ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक पाहता शिवसेना-राष्ट्रवादी आणि इतर छोटे पक्ष छोटे आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता आहे.

२०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा :
२०२४ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडी करण्याची अधिक शक्यता आहे आणि त्याप्रमाणेच या दोन्ही पक्षातील राजकीय नातेसंबंध अधिक घट्ट होताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी देखील आज राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास राज्यात चमत्कार घडेल असं म्हटलं होते. कारण या दोन्ही पक्षांना झालेल्या एकूण मतदानाचा आकडा पाहिल्यास त्याचे संकेत मिळू शकतात आणि त्याच अनुषंगाने दोन्ही पक्ष रणनीती आखात होते. त्यामुळे भाजप राज्यात सत्तेत येणार नाही असे संकेत मिळू लागले होते. त्यामुळेच भाजपने शिंदे यांना गळाला लावून त्यांच्या मार्फतच आपल्या सर्व बंडखोर नेत्यांना केवळ राष्ट्रवादीला लक्ष करण्याचं स्क्रिप्ट लिहून दिल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. तसेच लोकांना महागाई आणि बेरोजगारी सारख्या ठळक मुद्यावरून परावृत्त करण्यासाठी शिंदे गटाला केवळ हिंदुत्वाचा पाढा वाचण्याची स्क्रिप्ट दिली आहे आणि त्याप्रमाणे ते चालत आहेत असंच दिसतंय. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये युती घडवून आणण्याच्या प्रयत्नात संजय राऊत महत्वाची भूमिका बजावत असल्याने अर्थात त्यांच्याविरोधात देखील भाजपने शिंदे गटाला एक स्क्रिप्ट आखून दिली आहे आणि त्याप्रमाणे शिंदे गट चालत आहेत.

या आकडेवारीमुळे भाजप राज्यात सत्त्तेत येणार नव्हतं म्हणून शिंदेंना गळालं लावलं:
मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.

शिंदे गटाच्या वापर सेनेची मतं फोडण्यासाठी :
दुसरीकडे भाजपाला मागील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही १,४१,९९,३८४ असून मतांची टक्केवारी २५.७५ इतकी आहे. याचा अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या एकूण मंतांची आकडेवारीही १ कोटी ८३ लाखाच्या घरात जाते, जी भाजपाला मिळालेल्या एकूण मतांपेक्षा ३१ लाखाने अधिक आहे. उद्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र जरी आले तरी काँग्रेस-भाजप एकत्र येणे कदापि शक्य नाही. तर दुसरीकडे काँग्रेसने वंचितला सोबत घेतल्यास ती काँग्रेससाठी राजकीय आत्महत्या ठरेल. तर भाजपकडे मनसे व्यतिरिक्त कोणताही पर्याय नसेल. मात्र त्याची शक्यता देखील फारच कमी आहे. कारण मनसेची प्रत्यक्ष जमिनीवरील पक्ष बाधंणी अत्यंत कमकुवत आहे. तसेच स्वतःच्या ताकदीवर निवडून येतील असे नेतेच नाहीत त्यामुळे भाजप स्वतःच नुकसान करून घेणार नाही.

देशातील भाजपचे सर्व सहकारी पक्ष स्वतःच अस्तित्व मिटू नये म्हणून भाजपपासून दूर गेले. तर दुसरीकडे शिंदे मात्र भाजपच्या जवळ गेल्याने ती भविष्यातील राजकीय आत्महत्या ठरू शकते. उद्या सुप्रीम कोर्टात काही वेगळा निकाल लागल्यास आणि तो शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास त्यांच्यासोबत गेलेल्यांची राजकीय आत्महत्या निश्चित असल्याचं राजकीय तज्ज्ञ सांगतात. शिंदे हे राज्यातील सामान्य लोकांना हवा असलेला चेहरा नाही त्यामुळे ते कोणाला निवडून आणणार यात शंका आहे. जास्तीत जास्त ठाण्याचे स्थानक नेते असल्याचं सिद्ध होईल. त्याच्याकडे राजकीय व्यासपीठ गाजविण्याची कला नाही किंवा ते त्यांच्या व्यक्तिमत्वात नाही.

शिंदेंची प्रतिमा शिवसेना संपवू पाहणारा नेता अशी झाली आहे :
सामान्य लोकांमध्ये शिंदेंची प्रतिमा बंडखोर आणि शिवसेनेला संपवू पाहणारा नेता अशी झाल्याचं जनमानसात दिसत असल्याने मतदार मोठी भडास काढण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदारांचा तोरा जणू मतदार सुद्धा आमच्यासोबत आहेत असाच असल्याचं दिसत आहे. मात्र खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना यातील साधा फरक राज्यातील सामान्य मतदारांना कळतो. त्यामुळे शिंदेंच्या भाजपने आखून दिलेल्या स्क्रिप्टचा कोणताही राजकीय लाभ होणार नाही. गुजरातपासून झालेलं राजकीय ब्लॅकमेलिंगच नाट्य संपूर्ण महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने पहिले आहे. त्यामुळे लोकं योग्य वेळी या बंडखोरांना मतपेटीतून अद्दल घडवतील असं राजकीय विश्लेषक ठामपणे सांगतात. त्यामुळेच त्यांची व्हिडिओतुन सुरु झालेली हेडलाईन मॅनेजमेंटची नाटकं २ दिवसात पकडली गेली आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde playing anti NCP politics because of BJP political program check details 13 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x