27 September 2023 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ganesh Pandal Fire | पुण्यात गणेश मंडपाला आग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि बावनकुळे देखील मंडपात उपस्थित होते GTL Infra Vs Sonu Infra Share | जीटीएल इन्फ्राला ऑर्डर मिळेना, पण सोनू इन्फ्राटेक कंपनीला रिलायन्ससह अनेक ऑर्डर्स, स्वस्त शेअर सुसाट तेजीत Zen Tech Share Price | मार्ग श्रीमंतीचा! झेन टेक्नॉलॉजी शेअरने अवघ्या 9 महिन्यात 317 टक्के परतावा दिला, भरवशाचा स्टॉक खरेदी करणार? Multibagger Stocks | एलटी फूड्स शेअरने अल्पावधीत 75 टक्के परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी, कारण काय? Tata Power Share Price | पॉवर सेक्टर स्टॉकमध्ये जोरदार तेजी, विजेच्या वाढत्या मागणीचा फायदा टाटा पॉवर शेअरला होणार? Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 27 सप्टेंबर 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! सणासुदीच्या दिवसात सोन्याचे भाव धडाम झाले, घसरण सुरूच, आज किती स्वस्त झाले सोन्याचे दर जाणून घ्या
x

ST Bus | यवतमाळमध्ये ड्रायव्हरच्या चुकीने नदीत वाहून गेली एसटी बस | बचावकार्य सुरू

ST Bus

यवतमाळ, २८ सप्टेंबर | मरखेड येथील दहागावातील पुलावरून हिरकणी एसटी बस (एमएच १४ बीटी ५०१८) पाण्यात वाहून गेली आहे. पुलावरून पाणी जात असताना चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना गावकऱ्याच्या मदतीने बाहेर काढन्याचे काम सुरू आहे. या बसमध्ये 15 ते 20 प्रवाशी प्रवास करत होते. नांदेड-नागपूर ही बस असून नांदेडवरून नागपूरला पुसद मार्गे जात होती. घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, या घटनेत एक मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून त्याला उमरखेडच्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Hirkani ST bus (MH 14 BT 5018) has been swept away from the bridge at Dahakgaon in Markhed. The accident took place when the driver did not anticipate the road while water was flowing from the bridge :

यवतमाळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या दहागाव जवळील नदीवरील पुलावर ही घटना घडली. पुरामुळे हा पूल पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. ही राज्य परिवहन बस नांदेडहून नागपूरकडे जात होती. बस चालकाने पुराची तीव्रता पाहूनही प्रवाशांचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. बस पुलाच्या माथ्यावर पोहचताच ती पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे उलटली आणि काही अंतरावर वाहून गेली.

ताज्या माहितीनुसार, बसमधील बहुतेक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. बसच्या ड्रायव्हरचीही सुटका करण्यात आली असून त्याला ताब्यात ठेवण्यात आले आहे. जर प्रकरणाच्या तपासादरम्यान त्याची चूक सिद्ध झाली तर लोकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. बचावकार्य अद्याप सुरू आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: State transport ST bus drown in water near Umarkhed in Yavatmal.

हॅशटॅग्स

#Accident(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x