28 May 2022 4:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | या शेअरने फक्त 1 वर्षात 10 हजाराच्या गुंतवणुकीचे तब्बल 23 लाख रुपये केले Mutual Fund SIP | या फंडाच्या महिना 10 हजाराच्या एसआयपीने अल्पावधीत 17.58 लाख मिळाले | तुम्हीही नफा कमवाल Fake Reviews on e-Commerce | ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील बनावट रिव्ह्यू | ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्यांवर लगाम लागणार Tata AIA Life Insurance | टाटा एआयए स्मार्ट व्हॅल्यू इन्कम इन्शुरन्स प्लॅन लाँच | पॉलिसीचे फायदे जाणून घ्या Multibagger Penny Stocks | अदाणींची या कंपनीत एन्ट्री | 1 महिन्यांत 7 रुपयांच्या शेअरने 160 टक्के परतावा Tesla Motors | भारतात होणार जगप्रसिद्ध टेस्ला कारचे उत्पादन? | एलॉन मस्क यांनी दिली मोठी माहिती CIBIL Score | चांगला सिबिल स्कोअर म्हणजे काय ज्यावर तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळेल | स्कोअर असा तपासा
x

लालपरीच्या जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारची परवानगी

Maharashtra Govt , Resumption, Inter District ST Mahamandal Bus Services, Unlock

मुंबई, १९ ऑगस्ट : दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पूर्ण लॉकडाऊन काळात एसटीला दररोज २२ कोटी रुपयांचा फटका बसत होता. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यांतर्गंत वाहतूक सुरू करण्यात आली आहे. क्षमतेपेक्षा निम्मे प्रवासी घेऊन वाहतूक करावी लागत आहे. एवढेही प्रवासी मिळविण्यासाठी एसटीला ‘आवाज’ मारण्याची वेळ आली आहे. तास-दीड तासात मिळेल तेवढे प्रवासी घेऊन एसटी मार्गस्थ होत आहे. मार्गात कुठेही थांबायचे नसल्याने थेट प्रवासी घेऊन बस निघत आहे. खर्च अधिक आणि उत्पन्न कमी आहे. त्यातच, आंतरजिल्हा बससेवा सुरु करण्याची मागणीही प्रवाशांकडून करण्यात येत होती. त्यास, राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

 

News English Summary: The state has been allowed to start bus services. This has paved the way for buses plying within the district to run outside the district. But e-pass will be mandatory for other private vehicles.

News English Title: Maharashtra Govt Allows Resumption Of Inter District ST Mahamandal Bus Services Of State Transport Corporation News Latest Updates.

हॅशटॅग्स

#STMahamandal(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x