15 May 2021 1:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
राज्याला अधिक मदत द्या असं फडणवीसांकडून मोदींना एकही पत्र नाही, पण सोनिया गांधींना पत्र लिहिण्यास वेळ काढला फडणवीसजी सरकार लोकांचे जीव वाचविण्यात व्यस्त, तुम्ही भाजपची माशा मारण्याची स्पर्धा भरवत बसा - राष्ट्रवादी ज्याचं अग्नी दहन व्हायला हवं होतं, त्यांना दफन केलं जातंय, तुम्ही कसले हिंदू रक्षक - काँग्रेस महाराष्ट्र सरकारची लस खरेदी निविदा मोदी सरकारने परवानगी न दिल्याने रखडली Alert | महाराष्ट्रात म्यूकरमायकोसिसमुळे ५२ जणांचा मृत्यू, सर्वच जण कोरोनातून बरे झाले हाेतेे ताैक्ते’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने | अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हे वर्ष अधिक जीवघेणं असेल | महामारीच्या या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील - WHO
x

राऊतांना उपचारासाठी वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं: रावसाहेब दानवे

BJP Leader Raosaheb Danve, BJP, MP Sanjay Raut, Govt Formation

मुंबई: राज्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी केली. त्यांनतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी तर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यानंतर अजित पवार यांचे गटनेतेपद काढून टाकण्यात आले. यावर राजकीय वर्तुळात बराच गदारोळ माजला. तसेच अजित पवार यांनी पाठिंबा दिला तेव्हा ते राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते होते आणि आजही तेच नेते आहेत त्यांनी काढलेला व्हिप राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाळावाच लागेल” असंही रावासाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. या संबंधी भारतीय जनता पक्षाचे नेता रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांना अजूनही गटनेतेपदाचे अधिकार असल्याचे सांगितले.

BhagyaVivah Marathi Matrimonial

तसेच संजय राऊतांनी जास्त बोलू नये, राऊतांना उपचाराची गरज आहे. त्यांना वेड्याच्या इस्पितळात दाखल करावं असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. त्याचसोबत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुढील ५ वर्ष राज्याला स्थिर सरकार देतील. ज्या दिवशी राज्यपालांकडे भारतीय जनता पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला. त्यावेळी अजित पवार राष्ट्रवादीचे गटनेते होते. त्यांच्या ५४ आमदारांचे पत्र राज्यपालांना देण्यात आलं आहे. आजही अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यामुळे अजितदादा जो व्हिप देतील तोच व्हिप राष्ट्रवादीच्या आमदारांना लागू होणार आहे. अजित पवारांना सत्तास्थापनेचा पूर्णपणे अधिकार होता असंही दानवेंनी स्पष्ट केलं आहे.

दानवे म्हणाले, ”सध्या काय बोलावं आणि काय बोलू नये हे संजय राऊत यांना अजूनही समजत नाही. राजकीय नाट्यामध्ये शिवसेनेला त्यांचा नेताही शोधताही आला नाही. जे कपिल सिब्बल कोर्टामध्ये आज शिवसेनेची बाजू मांडत आहेत त्या कपिल सिब्बल यांनी राम हे काल्पनिक आहेत वास्तव नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यावेळी कपिल सिब्बल यांच्याबद्दल टीका करणारा लेख संजय राऊत यांनीच लिहिला होता. त्या लेखात कपिल सिब्बल यांचा उल्लेख माकड असा केला होता. आता तेच कपिल सिब्बल यांची मदत शिवसेना घेत आहे ” असाही आरोप दानवे यांनी केला.

हॅशटॅग्स

#RaoSahebDanve(6)#Sanjay Raut(215)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x