महाराष्ट्रात कोणी ज्योतिरादित्य निर्माण होईल याची ५ वर्ष वाट बघत बसा - अजित पवार
मुंबई, १३ मार्च: राज्यातील शिवसेना- भाजप युती नेमकी कशामुळे तुटली, कोणी कोणास फसविले याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला अखेर गुरुवारी विधानसभेत पूर्णविराम मिळाला. होय, आम्ही शिवसेनेला फसविले. कधी ना कधी आम्ही ही चूक सुधारू, अशा शब्दात भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी युतीत कोणी कोणाला फसविले याची स्पष्ट कबुली दिली. आमच्या चुकीचा तुम्ही एवढा फायदा उचलू नका. राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच असे सांगत काँग्रेस- राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला.
ज्योतिरादित्य शिंदे यांनी या आठवड्यात काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. हा मुद्दा पकडून विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीच त्यांनी विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतल्याची आठवण करून दिली. त्यावर अजित पवार यांनी वरील उत्तर दिले.
ते म्हणाले, मी कधी लपून-छपून काही करत नाही. जे काही असेल ते उघडपणे करतो. त्यावेळी तुमच्याकडे उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. त्यानंतर इकडेही उघडपणे आलो आणि उपमुख्यमंत्री झालो. ज्योतिरादित्य शिंदेसारखे महाराष्ट्रात काहीही होणार नाही. तुम्ही तुमच्या पक्षाकडेच लक्ष द्या. काही जण सभागृहात दिसत नाहीत. त्यांच्याकडे बघा, अशा स्वरुपाचे उत्तर अजित पवार यांनी दिले.
“राज्यातही कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईल अंस म्हणत पुढची ५ वर्ष तिथं काढलीत तरी चालतील. असं सांगतंच तुम्हाला सगळं सांभाळून घ्यावं लागणार आहे. नाही तर तुमचीच माणसं इकडे तिकडे जातील. आमच्याकडे कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही, पण तुमच्याकडे होणार नाही याकडे लक्ष ठेवा. बरेच जण गैरहजर आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा,” असा चिमटा अजित पवार यांनी यावेळी काढला.
News English Summery: Jyotiraditya Shinde left the Congress this week and joined the BJP. Taking this issue, Sudhir Mungantiwar tried to scare the ruling party in the assembly. At that time, he recalled that Ajit Pawar had sworn in with Devendra Fadnavis after the assembly elections. Ajit Pawar replied above. That said, I never do anything in secret. Whatever it is, it does it openly. At that time I came to you openly and became the Deputy Chief Minister. After that, he came here and became the Deputy Chief Minister. Nothing will happen in Maharashtra like Jyotiraditya Shinde. You pay attention to your party. Some do not appear in the hall. Look at them, Ajit Pawar replied.
Web News Title: Story Deputy Chief Minister Ajit Pawar shivsena slams BJP leader Sudhir Mungantiwar over Jyotiraditya Scindia Madhya Pradesh Politics in Maharashtra.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Oppo Find X8 | Oppo Find X8 सिरीजची पहिली सेल, नव्या फोनवर जबरदस्त ऑफर, जाणून घ्या अनोख्या फीचर्सबद्दल - Marathi News
- Government Job | महाराष्ट्र कृषी विभागात सरकारी नोकरीची संधी, कसा कराल अर्ज, जाणून घ्या सविस्तर - Marathi News