व्हिडिओ: २०१४ मध्ये जाहीर केलेल्या वचननाम्यात शिवसेना आणि भाजपने महाराष्ट्र टोलमुक्त करण्याचे वचनच दिले होते, परंतु सत्तेत आल्यानंतर त्यांना याचा विसर पडला. मुंबई प्रवेशद्वारांवर असलेले टोलनाके म्हणजे ट्रॅफिक आणि प्रदूषण समस्या निर्माण करणारे मूळ होय. या प्रदूषणाचा आणि ट्रॅफिक समस्येचा त्रास तेथील स्थानिकांना रोजच सोसावा लागतो, परंतु यावर तोडगा काढण्यास सत्तेत बसलेलं युती सरकार तयार नाही. शिवसेनेने महिन्याभरासाठी मुलुंड आणि ऐरोली टोलनाके बंद करून हलक्या वाहन धारकांना काहीसा दिलासा दिला परंतु आता पुन्हा हे टोलनाके सुरू झाले व तो रोजचा ट्रॅफिक आणि प्रदूषणाचा त्रास सुद्धा सुरु झाला. परंतु सामान्य माणूस आज या युती सरकारला त्यांच्या वाचनाम्याची आठवण करून देत आहे.
