12 December 2024 8:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

सामना'ने भिडेंची तुलना बाजीप्रभुंशी केल्याचं भिडेंना सहन झालं; पण उदयनराजेंचा अपमान सहन नाही?

Sambhaji Bhide, CM Udhav Thackeray, MP Sanjay Raut

सांगली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी खासदार छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज शुक्रवारी सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी आज सांगली बंदचं आवाहन केलं आहे. सांगलीमध्ये आज सकाळपासून दुकानं बंद आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या बंदचा परिणाम मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर होण्याची शक्यता आहे. सांगली बंद आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संभाजी भिडे यांनी उदयनराजेंचा अपमान सहन करु शकत नाही असं सांगत संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. वागताना बोलताना तारतम्य बाळगावं असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. “संजय राऊत असो किंवा गोयल असो, शिवरायांच्या परंपरेला कलंक लागेल असं वागलेलं चालणार नाही. संजय राऊत यांनी ठिणगीला पाय लावला आहे. ते त्या स्थानावर राहता कामा नये. संजय राऊत यांना पदावरुन दूर करा अशी माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हात जोडून विनंती आहे,” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.

‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आणि रयतेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या कोणत्याही मावळ्याशी एखाद्याची तुलना करावी हे तर लांबच, पण त्यांच्या चरणांची धूळ व्हावी इतकी लायकी असलेलं तरी कोणी उरलं आहे का ? केवळ जातीय समीकरण आणि विशिष्ठ समाजाच्या मतांना डोंळ्यासमोर ठेऊन, कोणत्याही व्यक्तीची तुलना महाराजांशी किंवा त्यांच्या मावळ्यांशी करण्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. तसाच प्रकार शिवसेनेने देखील विधानसभा निवडणुकीपूर्वी केला होता.

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची तुला थेट बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी करण्यात आली होती. कारण त्यावेळी संभाजी भिडे यांनी केलेल्या एका वादग्रस्त दाव्याने त्यांच्यावर टीकेचा तुफान भडीमार झाला होता, त्यानंतर शिवसेनेने संभाजी भिडे हे सध्याच्या युगातले बाजीप्रभू देशपांडे आहेत, असे ‘सामना’त म्हटले होते. स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी कधी कोणाची जात बघितली नाही. परंतु सध्याच्या राजकारणाची एकूण गणितच जातीवर अवलंबून असल्याने असले केविलवाणे प्रयोग केले जात आहेत असंच म्हणावं लागेल. त्यामुळे स्वतःची तुलना थेट बाजीप्रभू देशपांडेंशी झाल्यावर देखील सर्वकाही सहन करणारे संभाजी भिडे, उदयनराजे यांचा अपमान सहन करू शकले नाहीत यावरून नेमकं राजकरण काय आहे यावर समाज माध्यमांवर चर्चा रंगली आहे.

नक्की ‘सामना’ मुखपत्रात काय म्हटलं होतं?

“हिंदुत्व, छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी कुणाची जीभ घसरलीच तर त्यांचा समाचार घेण्यासाठी भिडे गुरुजी उसळून उभे राहतात. त्या अर्थाने ते शिवसेनाप्रमुखांचे ‘धारकरी’ आहेत. काही प्रसंगी भिडे गुरुजी हे ‘मातोश्री’वर येऊन शिवसेनाप्रमुखांना भेटलेही आहेत. ते आमच्याशीही बोलत असतात. हिंदुत्व रक्षणाच्या बाबतीत भिडेगुरुजी हे सध्याच्या युगातील बाजीप्रभू देशपांडेच आहेत.”, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले होते.

“भिडे गुरुजींची जिद्द व हिंमत वाखाणण्यासारखी आहे. त्यांचा कणा ताठ व बाणा अफाट आहे. त्यांच्या वाणीला तलवारीची धार आहे. त्याच तलवारीच्या धारेवरून त्यांचा प्रवास सुरू असतो, पण दुश्मनांच्या हातात तलवारी नसून बंदुका आणि बॉम्ब आहेत हेदेखील लक्षात घ्यायला हवे.” असे म्हणत, ‘सामना’त पुढे म्हटले होते की, “कसाब आणि त्याची पाकिस्तानी टोळी मुंबईवर चाल करून आली ती हातात तलवार घेऊन नाही. एके–४७ आणि बॉम्बचा मारा करीत हे नराधम मुंबईत घुसले होते. या सगळय़ाचा विचार करूनच भिडे गुरुजींना त्यांची तलवारबंद फौज उभी करावी लागेल. आम्ही सदैव त्यांच्यासोबत आहोतच.”

 

Web Title:  Sack MP Sanjay Raut from all posts Sambhaji Bhide urges Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Sanjay Raut(262)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x