26 April 2024 11:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या
x

सांगली बंद यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय: सुप्रिया सुळे

Sangli Band, Sambhaji Bhide, NCP MP Supriya Sule, MP Sanjay Jadhav

पुणे: एनसीपी’च्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी शुक्रवारी पुकारलेल्या सांगली बंदवर खोचक टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, हे दुर्दैव म्हणावं लागेल. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकवलं आणि त्यांच्यासाठी ‘बंद’. हे जरा चुकीचे वाटतं… यात काहीतरी राजकीय षडयंत्र दिसतंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर असं करणं हे योग्य वाटत नाही. संजय राऊत यांनी कालच त्यांचे वक्तव्य मागे घेतले आहे. त्यामुळे ती चर्चा न करता राज्यात आज अनेक गंभीर प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, परिवहन विभाग आणि पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. आज याच्या सांगता समारोहास उपस्थित राहून खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांनी प्रसार माध्यमांकडे सांगलीतील विषयावर भाष्य केलं.

याचबरोबर, आमच्या सरकारसमोर अनेक आव्हाने आहेत. शेतकरी, नोकरी, अर्थव्यवस्था याकडे प्रामुख्याने पाहणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. आधीचे सरकार दडपशाहीचे होते. मात्र आमचे तसे नाही. चंद्रकांत पाटील यांना आमच्या सरकारवर टीका करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तो त्यांना संविधानाने दिला आहे, असे सांगत सुप्रिया सुळे यांनी भाजपावर निशाणा साधला.

प्रत्येकाला आक्षेप नोंदवण्याचा अधिकार आहे, आमचं दडपशाहीचं सरकार नाही, हाच फरक त्यांच्यात (फडणवीस सरकार) आणि आमच्यात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मनमोकळ्या मनाने टीका करण्याचा अधिकार आहे. आम्ही आमचं काम करत राहू त्यांनी दिलदारपणे आमच्यावर टीका करावी, असा टोलाच सुप्रिया सुळे यांनी लगावला.

‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे. राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून साताऱ्यानंतर आज सांगलीत बंद पुकारण्यात आला आहे.

 

Web Title:  NCP MP Supriya Sule comment Sambhaji Bhide called Sangli Band against MP Sanjay Rauts statement.

हॅशटॅग्स

#SupriyaSule(32)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x