27 July 2024 8:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

विनायक मेटे यांचं अपघाती मृत्यू प्रकरण | ट्रकचालक सापडला, पण प्रत्यक्षात तो ट्रक कुठे आहे? संशय बळावू लागला

Former MLA Vinayak Mete

Vinayak Mete | शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालंय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर त्यांच्या त्यांच्या गाडीला अपघात झाला. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काल त्यांचं पार्थिव मुंबईतील वडाळ्यातील त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ते बीडच्या दिशेने रवाना झालं.

त्यांचं पार्थिव बीडमधील केज तालुक्यातील राजेगाव या त्यांच्या मूळगावी दाखल झालं आहे. गावातील लोक, त्यांचे समर्थक कार्यकर्ते यांना अंत्यदर्शन घेता यावं यासाठी त्यांचं पार्थिव शिवसंग्राम भवनात आणि त्यांच्या घरात ठेवण्यात येणार आहे. विनायक मेटेंवर आज दुपारी तीन वाजता राजेगाव या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

दरम्यान, विनायक मेटेंच्या गाडीने समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याचं पोलिसांनी दिलेल्या माहितीत म्हटलं होतं. विनायक मेटे यांची गाडी ज्या ट्रकवर जाऊन आदळली, त्या ट्रक चालकाला शोधण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. विनायक मेटे अपघात प्रकरणांमध्ये त्यांच्या गाडीचा ज्या ट्रकमुळे अपघात झाला होता, तो ट्रक दमणमध्ये असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. नंतर रायगड पोलिसांनी पालघर पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. या प्रकरणात पोलिसांनी अधिक तपास केला. या ट्रकचा मालक पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचं समोर आलं. त्यानुसार पालघर पोलिसांनी ट्रक मालकाला विश्वासात घेऊन अपघातासंबंधी माहिती दिली. ट्रक तसेच ट्रक चालकाची माहिती देण्याची मालकाला विनंती केली.

मालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. ट्रक व ट्रक चालकाचा शोध घेतला असता, तो दमण येथे असल्याचं तपासातून समोर आलं. त्यानुसार कासा पोलीस ठाण्याचे (पालघर) अधिकारी श्रीकांत शिंदे व त्यांच्या पथकानं तातडीने पालघरहून दमणकडे धाव घेतली. दरम्यान, पालघर पोलिसांनी ट्रक सुपूर्द केल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात हा ट्रक कुठे आहे? ही माहिती अजूनपर्यंत पोलिसांनी दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात आणखीन संशय बळावू लागला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Former MLA Vinayak Mete’s death in road accident check details 15 August 2022.

हॅशटॅग्स

#Former MLA Vinayak Mete(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x