8 May 2024 8:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

मणिपूर हिंसाचार ते कोणत्याही विषयावरून वाढणारं धामिर्क हिंदू-मुस्लिम तेढ, अमेरिकेत 'क्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया' वॅनसह निदर्शनं

PM Modi on US Visit

PM Modi on US Visit | पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतापासून ते राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना भेटण्यापर्यंतचे फोटो येत आहेत. या फोटोंसोबतच सोशल मीडियावर असे काही फोटोही व्हायरल होत आहेत, ज्यावर वाद होत आहेत.

भारतात मोदी सत्तेत आल्यापासून हिंदू मुस्लिम तेढ वाढलं असून मणिपूर सारखी राज्य जातीय हिंसाचाराचे बळी ठरत आहेत. तसेच लोकसभा निवडणुका जवळ आल्याने यामध्ये अधिक पडल्याचं पाहायला मिळतंय. त्याचे पडसाद आता अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावेळी सुद्धा स्पष्ट दिसू लागले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात टिप्पण्या घेऊन फिरणाऱ्या ट्रक न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. या ट्रकवर डिजिटल डिस्प्ले आहेत. या सर्वांवर ‘क्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ हा हॅशटॅग लिहिलेला आहे. वेगवेगळ्या फोटोंमध्ये पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त गोष्टी लिहिल्या आहेत. हे फोटो न्यूयॉर्क शहरातील रस्त्यांवरील असल्याचा दावा केला जात आहे.

२००५ ते २०१४ या काळात मोदींवर अमेरिकेत बंदी का घालण्यात आली?
उत्तर : विशेषत: धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनासाठी. या कारणास्तव एकमेव व्यक्ती ज्यांचा व्हिसा नाकारण्यात आला होता. असं एका डिस्प्लेवर लिहिण्यात आलं आहे.

आणखी एका पोस्टरवर लिहिले आहे :
जो बायडेन यांनी मोदींना विचारले की, आपल्याच सरकारमधील खासदारावर लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर महिला कुस्तीपटूंना का ताब्यात घेण्यात आले?

एका पोस्टरवर लिहिले आहे :
मोदींच्या राजवटीत मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांच्या मॉब लिंचिंगमध्ये वाढ झाली आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? कोणतीही जबाबदारी न घेता.

News Title : PM Modi on US Visit Crime Minister of India vans protest check details on 22 June 2023.

हॅशटॅग्स

#PM Modi US Visit(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x