14 December 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

गृह राज्यमंत्री सेनेचे, तरी आश्वासन 'वसईतील गुंडगिरी मोडून काढू'?

वसई : सध्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला असून दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यात कोणती सुद्धा कसर शिल्लक ठेवताना दिसत नाहीत. तसाच काहीसा प्रकार सेनेच्या प्रचारादरम्यान घडला आहे. कारण प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी वसईकरांना आश्वासन दिल की,’आम्ही वसईतील गुंडगिरी मोडून काढू’. विषय गमतीचा असा आहे की सध्या राज्यात भाजप-शिवसेनेच्या युतीच राज्य आहे. त्यात कायदा व सुव्यवस्था संबंधित मंत्रालय म्हणजे फडणवीस गृहमंत्री तर सेनेचे दीपक केसरकर हे राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत.

विशेष म्हणजे सध्या लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरु आहे आणि कायदा व सुव्यवस्था हा विषय खासदाराच्या अखत्यारीतला नाही. कायदा व सुव्यवस्था हा राज्याच्या गृहमंत्रालयाशी संबंधित विषय आहे. तसेच राज्याचं गृहमंत्री पद देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे दीपक केसरकर यांच्याकडे आहे.

कालच्या सभेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी वसईकरांना आश्वासन दिलं की,’आम्ही वसईतील गुंडगिरी मोडून काढू’. उद्धव ठाकरेंच्या सभेतील रोख हा ठाकूर कुटुंबियांशी संबंधित होता. परंतु विषय हा आहे की, सत्तेत येऊन ४ वर्ष उलटली तरी वसई – विरारमधील ठाकूर कुटुंबीयांची गुंडगिरी संपविण्यासाठी किव्हा नियंत्रणात आणण्यासाठी शिवसेनेचे गृहराज्यमंत्री यांना ४ वर्ष कोणी रोखलं होत का ? असा प्रश्न स्थनिक करत आहेत.

वसई मध्ये सोडा इथे संपूर्ण राज्यात कायदा व सुव्यस्थेची काय अवस्था आहे ते सर्वश्रुत आहे. किंबहुना राज्याला गृहमंत्री आहे की नाही असा प्रश्न सामान्य जनता उपस्थित करत होती. अगदी अलीकडेच घडलेली अहमदनगर मधील दुहेरी हत्याकांड घटना आणि तिथे काय परिस्थिती होती हे वेगळं सांगायला नको.

स्वतः उद्धव ठाकरे यांनीच सभेत मान्य केलं की वसई-विरारकडे आजवर दुर्लक्ष झालं आहे. परंतु आता वसईतील गुंडगिरी मोडून काढू. केवळ निवडणूका आल्या की कायदा आणि सुव्यवस्थेचे दाखले देत सुटायचे हे नित्याचाच असल्याचं स्थानिक नागरिक बोलत आहेत. दुर्दैव म्हणजे सत्ताधारी शिवसनेंकडेच राज्याचं गृह राज्यमंत्रीपद आहे, मग शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांना कोणी रोखलं होत का ४ वर्ष वसईतील ठाकूर कुटुंबीयांची गुंडगिरी मोडून काढण्यापासून ? असा प्रति प्रश्न वसईतील अनेक नागरिकांनी केला आहे.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x