
Tega Industries Share Price| टेगा इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 925.60 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत स्पर्श केली होती. यानंतर प्रॉफिट बुकींग मुळे स्टॉक 1.79 टक्के घसरणीसह 883.70 रुपये किमतीवर क्लोज झाला होता.
टेगा इंडस्ट्रीज शेअरची सध्याची किंमत
मार्च 2023 तिमाहीतील जबरदस्त कामगिरीमुळे टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर 10 टक्क्यांच्या वाढीसह 899.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 818.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. आज शुक्रवार दिनांक 2 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के घसरणीसह 869.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
टेगा इंडस्ट्रीज कंपनीच्या स्टॉकने YoY आधारावर आपल्या ऑपरेटिंग महसूलात 36.7 टक्के वाढ केली आहे. त्याच वेळी या कंपनीचा ऑपरेटिंग EBITDA 49.2 टक्क्यांच्या वाढीसह 102.8 कोटी रुपयेवर पोहोचला आहे. या तिमाहीत कंपनीने 58.2 टक्क्यांच्या वाढीसह 77.3 कोटी रुपये नफा कमावला आहे.
मॅकनॅली सयाजी इंजिनिअरिंग कंपनीला 165 कोटी रुपयेमध्ये खरेदी केले
दरम्यान, टेगा इंडस्ट्रीज कंपनीने मॅकनॅली सयाजी इंजिनिअरिंग कंपनीला 165 कोटी रुपयेमध्ये खरेदी केले आहे. या डीलमध्ये 100 कोटी रुपयांचे कर्ज आणि 65 कोटी रुपयांच्या इक्विटीचा समावेश आहे. चिलीमधील नियोजित विस्तार प्रकल्पाची प्रगती चांगली होत असल्याची माहिती कंपनीच्या व्यवस्थापन मंडळाने दिली आहे.
ब्रोकरेज सल्ला
ब्रोकरेज फर्म LKP सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ टेगा इंडस्ट्रीज स्टॉकमधे गुंतवणूक करण्याबाबत सकारात्मक आहे. यासाठी तज्ञांनी 945 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. टेगा इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स डिसेंबर 2021 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते. हा IPO स्टॉक प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाला होता. 420.40 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून स्टॉक 115 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 31.46 टक्के परतावा कमावून दिला आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.