12 August 2020 8:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

"चला हवा येउ द्या" मधील एक सदस्य अडकणार लग्नाच्या बेडीत.

औरंगाबाद : ‘चला हवा येउ द्या’ शो मधील थुकरटवाडी आणि त्यातील विनोदाचे सम्राट कुशल बद्रिके,सागर कारंडे,भारत गणेशपुरे, भाऊ कदम, डॉ. निलेश साबळे आणि श्रेया बुगडे हे सगळ्यांनाच परिचित आहेत. यातील सर्वच विनोदी कलाकार हे आज मराठी घराघरात पोहोचले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पण त्याच आपल्या थुकरटवाडीतील आणखी एक सदस्य जो नेहमीच रसिकांना खळखळून हसवतो आणि ज्याची मूर्ती लहान पण विनोद करण्याची त्याची कीर्ती महान आहे. रसिकप्रेक्षकांना तो नेहमीच ‘चला हवा येउ द्या’ शोच्या सेट वर छोटा पॅक और बडा धमाका म्हणून परिचित आहे.

त्या विनोदवीराचे नाव आहे विनीत बोंडे. आपण त्याच्या अभिनयाची झलक ‘डोंबिवली फास्ट’ या सिनेमातून अनुभवली आहे. पण इतर विनोदवीरांप्रमाणेच त्यालाही म्हणजे विनीत बोंडेला खरी ओळख मिळवून दिली ती ‘चला हवा येउ द्या’ या भन्नाट विनोदी शोने.

हाच विनीत बोंडे आता लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. सोनम पवार या मुलीशी त्याचा विवाह जमलं आहे. काही दिवसांपूर्वीच विनीत आणि सोनम यांचा साखरपुडा औरंगाबाद येथे पार पडला. त्यावेळी त्यांचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते. त्याचा विवाह सोहळा सुद्धा औरंगाबाद येथेच ४ मार्चला पार पडणार आहे. सोनम पवार ही मूळची सोलापूरची असून ती पुण्यात नर्सिंगचं शिक्षण घेत आहे.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Chala Hawa Yeu Dya(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x