13 December 2024 3:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

सुशांतची मेंटल हेल्थ | कुटुंबियच गोत्यात येणार | चॅटमध्ये औषधांचं गुपित उघड

Sushant Singh Rajput, whatsapp chats, Sister Priyanka, Mental health

मुंबई, १ सप्टेंबर : सुशांतच्या मृत्यूचे वेगवेगळे कंगोरे आता कळू लागले आहेत. नवनव्या गोष्टी तपासात येऊ लागल्या आहेत. आधी मुंबई पोलिस मग सीबीआय मग ईडी मग नार्कोटिक्स असे वेगवेगळे विभाग यावर काम करू लागले आहेत. एकीकडे सुशांतचे मित्र, त्याच्या संपर्कात आलेली मंडळी, रिया चक्रवर्ती यांची चौकशी चालू असतानाच आता त्यातल्या चौकशीत समोर आलेल्या काही गोष्टींमुळे सुशांतचे कुटुंबीयच गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मात्र सुशांतच्या कुटुंबियांना सुशांतच्या मानसिक आजाराची कल्पना होती असं लक्षात आलं आहे. सुशांतच्या मॅनेजरचा फोन तपासल्यानंतर सुशांत त्याच्या डिप्रेशनसाठी जी हेवी औषधं घेत होता त्याची कल्पना त्या मॅनेजरने त्याच्या बहिणीला दिलेले हे मेसेज आहेत. डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शनच त्या मॅनेजरने बहिणीला पाठवल्याचे संदर्भ यात आहेत. यावरून सुशांत नैराश्यग्रस्त आहे हे आपल्याला माहित नव्हतं असा दावा जो सुशांतचे कुटुंबिय करतायत त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

सुशांत सिंह राजपूत आणि त्याची बहीण प्रियंका यांच्यामध्ये ८ जून रोजी झालेलं चॅट समोर आलं आहे. व्हॉट्सअॅपवर झालेल्या या चॅटमध्ये प्रियंका सुशांतला लिब्रियम कॅप्सूल एका आठवड्यासाठी बंद करुन नेक्सिटो १० mg गोळी सकाळी नाश्त्यानंतर घेण्यास सांगत आहे. तसंच प्रियंका सुशांतला लोनाझेप टॅबलेट सुद्धा इमर्जन्सीसाठी ठेवण्यास सांगत होती. जेणेकरुन एन्झायटीचा अटॅक जर आला तर त्यावेळी गोळ्या घेता येऊ शकतील.

या गोळ्या घेण्यासाठी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज असते आणि ही गोष्ट जेव्हा सुशांतने प्रियंकाला सांगितली तेव्हा तिने सुशांतला आपल्या एका परिचित डॉक्टरकडून प्रिस्क्रिप्शन घेऊन देण्याचं सांगितलं. तसंच हे नामवंत डॉक्टर असून मुंबईतील त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांना भेटून त्यांचा सल्ला घेण्यास ही मदत करेल, असं प्रियंकाने सुशांतला सांगितलं. प्रियंकाने ज्या गोळ्या सुशांतला घेण्यास सांगितला त्यामध्ये लिब्रियम, नेक्सिटो 10 mg, लोनाझेप या गोळ्यांचा समावेश आहे.

नेमकं काय चॅट झालं सुशांत आणि प्रियंकामध्ये?

प्रियंका : एका आठवड्यासाठी लिब्रियम घे आणि त्याच्यानंतर नेक्सिटो 10 mg घे सकाळी नाश्त्यानंतर आणि लोनाझेप जवळ ठेव जर एन्झायटीचा अटॅक आला तर घे..

सुशांत : ok सोनू दी (sonu di)

सुशांत : पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय या गोळ्या कोणी देणार नाहीत.

प्रियंका : थांब मी बघते काही करु शकते का?

Miss call

प्रियंका : बाबू कॉल मी, मला तुला प्रिस्क्रिप्शन पाठवायचं आहे.

प्रियंका : माझा मित्र एक नामांकित डॉक्टर आहे आणि मुंबईमध्ये त्याच्या चांगल्या ओळखीचे डॉक्टर आहेत, तुला जर दाखवायचे असेल तर आपण दाखवू आणि हे सर्व गुपित राहील काळजी करु नकोस..

प्रियंका : just called

प्रियंका : प्रिस्क्रिप्शन पाठवते

प्रियंका : बाबू हे प्रिस्क्रिप्शन आहे..

प्रियंका : हे दिल्लीचं (प्रिस्क्रिप्शन) आहे पण काळजी नको, कोणी विचारलं तर सांग ऑनलाईन कन्सल्ट केलं म्हणून.

सुशांत : थँक्स सोना दी.

ही औषधं नेमकी का घेतली जातात?

लिब्रियम : लिब्रियम एक कृत्रिम निद्रा आणणारं औषध आहे. याचा उपयोग चिंता कमी करणे आणि एखाद्या व्यसनापासून जसं की दारु, ड्रग्स आणि इतर गोष्टींपासून लांब ठेवण्यासाठी केला जातो.

नेक्सिटो 10 mg : नेक्सिटो 10 मिलीग्राम टॅब्लेट उदासीनता आणि चिंता, पॅनिक डिसऑर्डर आणि वेड-बाध्यकारी डिसऑर्डरसारख्या इतर मानसिक आरोग्याच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी लिहून दिले जाते. हा एक प्रकारचा अँटिडीप्रेससेंट आहे, ज्याला सेलेक्टिव्ह सेरोटोनिन रीपटेक इनहिबिटर (एसएसआरआय) म्हणून ओळखले जाते.

लोनाझेप टॅब्लेट : हे एक औषध आहे जे पॅनिक आणि चिंताग्रस्त डिसऑर्डरच्या उपचारांसाठी वापरले जाते.

मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर तरुण कुमार ज्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलं ते दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात डॉक्टर आहेत आणि राजपूत कुटुंबियांचे मित्र आहेत. सुशांतच्या तब्येतीबद्दल माहिती घेऊनच त्यांनी हे प्रिस्क्रिप्शन दिलं.

तर रियाच्या वकिलांनी हे चॅट समोर आल्यानंतर आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. सुशांतचे कुटुंबीय सुरुवातीपासूनच आरोप करत होते की रिया सुशांतच्या गोळ्यांमध्ये बदल करते आणि त्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला. मात्र या चॅटमुळे सुशांत ज्या गोळ्या घेत होता ते त्याच्या कुटुंबातील व्यक्तींनाच दिल्याचे स्पष्ट झालं आहे.

तसेच रियाच्या वकिलांनी स्पष्ट केलं की, प्रियंकाला 2019 पासूनच सुशांतच्या तब्येतीबद्दल माहिती होती. मेंटल हेल्थ ऍक्टप्रमाणे डॉक्टरने पेशंटला न तपासता या गोळ्या दिल्या आहेत आणि सुशांतचा opd पेशंट म्हणून उल्लेख केला आहे जे चुकीचं आहे. कोरोनाच्या महामारीदरम्यान ऑनलाईन कन्स्ल्टेशनला परवानगी होती, मात्र सुशांतच्या बाबतीत असं प्रिस्क्रिप्शन देणं योग्य नव्हतं.

 

News English Summary: A WhatsApp conversation between actor Sushant Singh Rajput and Priyanka Singh, dated June 8, the day Rhea Chakraborty left the house is doing rounds on the internet. The chat shows Priyanka not only recommended anxiety medicines to Sushant but also sourced a doctor’s prescription for him without actual consultation with the doctor.

News English Title: Sushant Singh Rajput whatsapp chats with sister Priyanka shows she knew about his mental health News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x