5 November 2024 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News
x

Bigg Boss Hindi 18 | बिग बॉस हिंदीच्या ग्रँड प्रीमियरची जोरदार चर्चा, घराचा आगळावेगळा लुक आला समोर - Marathi News

Highlights:

  • Bigg Boss Hindi 18
  • बिग बॉस 18 च्या थीमचं नाव आहे ‘टाईम का तांडव’ :
  • पाहायला मिळणार पुरातन काळातील गुफा :
  • भयावय आणि शांत तुरुंग :
  • आलिशान पेंटिंग्सने वेधलं लक्ष :
  • उद्या पार पडणार ग्रँड प्रीमियर :
Bigg Boss Hindi

Bigg Boss Hindi 18 | एकीकडे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा उद्या 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. त्यातच हिंदी बिग बॉसने सर्व प्रेक्षकांच्या माना आपल्याकडे वळवल्या आहेत. 6 ऑक्टोबरला म्हणजेच उद्या बिग बॉस हिंदीच्या अठराव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे. अर्थातच याही सीजनच होस्टिंग बॉलीवूडचे भाईजान सलमान खान करणार आहे.

सलमानने आत्तापर्यंत बिग बॉसच्या याआधी होऊन गेलेल्या सीजनमध्ये होस्टिंगची चांगली धुरा सांभाळली आहे. दरम्यान 18 व्या सीजनची जोरदार चर्चा होत असून वेगवेगळे प्रोमो प्रेक्षकांसमोर येत आहेत. यामध्ये बिग बॉसच्या भव्य दिव्य घराचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

बिग बॉस 18 च्या थीमचं नाव आहे ‘टाईम का तांडव’ :
हिंदी बिग बॉसमध्ये बीबी हाऊस प्रत्येक वर्षी एका अनोख्या अंदाजात दाखवलं जातं. यावेळेसही अतिशय भव्य दिव्य घराचा नजारा असणारा व्हिडिओ वायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये घराचा नजारा पाहून अनेकांचे होश उडाले आहेत. नेहमीप्रमाणे यावर्षीचं ही बीबी हाऊस ओमांग कुमार आणि त्यांच्या टीमने तयार केलं आहे.

पाहायला मिळणार पुरातन काळातील गुफा :
दरम्यान बिग बॉसच्या घरात पुरातन काळातील गुफा असणारा सेट तयार करण्यात आला आहे. या घरामध्ये गेल्याबरोबर आपण पुरातन काळात आलो आहोत की काय असा प्रश्न घरामध्ये प्रवेश घेणाऱ्या सदस्यांना नक्कीच पडेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

भयावय आणि शांत तुरुंग :
एवढेच नाही तर बीबी हाऊसमध्ये नेहमीप्रमाणे तुरुंग देखील बनवण्यात आला आहे. परंतु यावेळेस तर तुरुंग घराच्या आतमध्ये तयार केला आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ती जागा अतिशय गुप्तहेर आणि शांत असलेली पाहायला मिळतेय.

आलिशान पेंटिंग्सने वेधलं लक्ष :
जबरदस्त पेंटिंग्स, आलिशान शीशमहाल, त्याचबरोबर पुरातन काळातील गुफा या सर्व गोष्टी एकत्र करून बिग बॉसने यावेळेसच बीबी हाऊस अतिशय अलिशान आणि रोमांचक पद्धतीने सजवलं आहे. बेडरूम एरिया, तसेच गार्डन तेरी यादेखील अतिशय आलिशान पद्धतीने सजवल्यासारखं पाहायला मिळतय.

उद्या पार पडणार ग्रँड प्रीमियर :
उद्या सर्वात पहिले घरामध्ये कोणता सदस्य एन्ट्री घेणार आणि बिग बॉसच्या घराचं दर्शन घडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. अशातच काही सदस्यांची नावे समोर आली असून. उद्याच्या भागात आपल्याला सर्व काँटेस्टची ओळख सलमान खान करून देणार आहेत. दरम्यान यावेळेसच्या बिग बॉसच्या घराच्या थीमच नाव ‘टाईम का तांडव’ असं असून घरामध्ये एकूण 107 कॅमेरे लावण्यात आले आहेत. समस्त प्रेक्षकवर्ग 6 ऑक्टोबरची वाट पाहत आहेत.

Latest Marathi News | Bigg Boss Hindi 18 05 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Bigg Boss Hindi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x