VIDEO | अर्णब गोस्वामींची फेक पत्रकारिता आणि फेक दावे पुन्हा जगासमोर | असे पुन्हा तोंडघशी पडले
नवी दिल्ली, २० सप्टेंबर | मागील आठवड्यात रिपब्लिकवर, अर्णब गोस्वामीचा प्राइमटाइम शोमधील तालिबानसंबंधित “Taliban-Split” नावाने मोठी चर्चा झाली.अर्णब गोस्वामी यांनी दावा केला की तालिबान “तुटला आहे”, कारण त्याचे सहसंस्थापक मुल्ला बिरादार यांनी हक्कानी नेटवर्कशी काम करण्यास स्पष्ट नकार दिला होता असं सांगण्यात आलं.
VIDEO, अर्णब गोस्वामींची फेक पत्रकारिता आणि फेक दावे पुन्हा जगासमोर, असे पुन्हा तोंडघशी पडले – Republic TV Arnab Goswami again exposed in Prime Time show during Taliban Split talked :
धक्कादायक म्हणजे कार्यक्रमादरम्यान गोस्वामी यांनी एका धक्कादायक दावा केला आणि त्याची चर्चा देशात आणि नंतर जगभर पसरली आहे. अर्णब गोस्वामीने शो दरम्यान थेट दावा केला कि, ‘पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी काबूलमधील सेरेना हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर थांबले होते. रिपब्लिकच्या “गुप्तचर सूत्रांचा” हवाला देखील त्यांनी चर्चेत दिला. त्यांनी पुढे थेट स्वतःच्या सूत्रांच्या माहितीवरून “पाकिस्तानी अधिकार्यांनी रात्रीच्या जेवणासाठी काय खाल्लं” याचा देखील तपशील शो दरम्यान दिला.
अर्णब गोस्वामींच्या शोमधील पॅनेलिस्टपैकी एक, पीटीआयचे प्रवक्ते अब्दुल समद याकूब यांनी गोस्वामींना त्यांच्या सूत्रांविषयी प्रश्न विचारले. त्यावर गोस्वामी म्हणाला, “तुम्ही आज जाऊन तपासा … सेरेना हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर, मी तुम्हाला सांगत आहे, कृपया तपासा, काबूलमधील सेरेना हॉटेलचा पाचवा मजला, तेथे किती पाकिस्तानी सैन्य अधिकारी आहेत?” असा ठामपणे दावा केला.
त्यानंतर पीटीआयचे प्रवक्ते अब्दुल समद याकूब गोस्वामीला गोस्वामींना सांगितले की सेरेना हॉटेलमध्ये पाच नव्हे तर फक्त दोन मजले आहेत आणि त्याची खात्री त्यांनी स्वतःच्या सुत्रांमार्फत केल्याचा दावा केला आणि समाज माध्यमांवर काबूलमधील सेरेना हॉटेलचे फोटो झळकले आणि अर्णब गोस्वामी किती फेक न्यूज आणि चुकीचे दावे छातीठोकपणे करतात ते जगासमोर पुन्हा उघड होण्यास सुरुवात झाली.
विशेष म्हणजे आपण पकडले गेल्याच समजताच गोस्वामी म्हणाले आनंदाची बातमी आहे, तर तुम्हाला माहिती आहे की ते सेरेना हॉटेलमध्ये आहेत. तुम्ही हॉटेलला फोन केला आणि तुम्ही त्याची पुष्टी केली. मी तुमच्याविरुद्ध एक युक्ती खेळली आणि पाचव्या मजल्यावर सांगितले. पण त्यावर हास्यास्पद किस्सा घडला होता आणि त्याच चर्चेत अर्नबचं पुन्हा हसू झालं. कारण गोस्वामींना उत्तर देताना याकूबने उत्तर दिले की त्याने Google वर माहिती तपासली आहे. पण त्याआधीच गोस्वामी म्हणाले होते, तुम्ही हॉटेलला फोन केला आणि तुम्ही त्याची पुष्टी केली.
Arnab Goswami and his ‘intelligence sources’. 😭 pic.twitter.com/W9bCZxbw0D
— Mohammed Zubair (@zoo_bear) September 18, 2021
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.
News Title: Republic TV Arnab Goswami again exposed in Prime Time show during Taliban Split talked.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Upcoming Bikes 2024 | वर्षाच्या शेवटी होणार मोठा धमाका; लॉन्च होणार 'या' नव्या बाईक्स, आत्ताच लिस्ट चेक करा - Marathi News
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News