11 December 2024 3:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल IPO GMP | आला रे आला IPO आला, गुंतवणुकीची मोठी संधी, पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा - GMP IPO 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, जानेवारी 2025 मध्ये महागाई भत्ता इतका वाढणार, अपडेट आली Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम
x

संपूर्ण दिल्लीत बेड्ससहित सर्व माहिती अँपवर मिळणार; पण महाराष्ट्रात अजूनही नाही

Delhi, Corona virus, dashboard, App, Arvind Kejariwal

नवी दिल्ली, ३० मे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज जनतेशी संवाद साधला. येत्या सोमवारपासून दिल्लीकरांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी इकडे-तिकडे भटकण्याची गरज लागणार नाही. यासाठी दिल्ली सरकार एक नवे मोबाईल अँप लॉन्च करणार असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले.

केजरीवाल म्हणाले, दिल्ली सरकारने एकूण रुग्णांसाठी दुप्पट बेडची व्यवस्था केली आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर नेमकं कुठे उपचारासाठी संपर्क साधायचा? हा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित होतो. त्यामुळे हे मोबाईल अॅप्लिकेशन नागरिकांना फायदेशीर ठरू शकतं. या अँपमध्ये रुग्णालयांची माहिती असेल. कोणत्या रुग्णालयात किती बेड असतील, हे देखील या अँपद्वारे समजू शकेल, असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले. गेल्या १५ दिवसांत ८५०० करोना संक्रमित रुग्ण आढळलेत. परंतु, यातील केवळ ५०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतरांवर त्यांच्या घरीच उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे संपूर्ण देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात असलं कोणताही अत्याधुनिक अँप नाही जे संपूर्ण राज्यातील कोरोना सेंटरमधील उपलब्ध बेड्स, व्यापलेले बेड्स, कोरोना सेंटरमधील ऑस्किजन आणि व्हेंटिलेटरबाबत माहिती, कोरोना सेंटरचा पत्ता, राज्यातील लॅब्सचा पत्ता असं सर्वकाही एका क्लिकवर देऊ शकेल. राज्यभरातून या संबंधित तक्रारींचा पाऊस पडत असताना सरकार याबाबत सुस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील महापालिकेने याबाबत केवळ खाजगी इस्पितळाच्या बाबतीत माहिती देणारी यंत्रणा केली आहे आणि ते ३००० बेड्स आज जवळपास भरल्यात जमा आहेत. मात्र राज्यभरातील सामान्य लोकांना याबाबत माहिती देणारी कोणतीही ऑनलाईन यंत्रणा किंवा अँप नाही हे सत्य आहे.

 

News English Summary: On the backdrop of Corona, Chief Minister Arvind Kejriwal interacted with the people today. From next Monday, Delhiites will not have to wander around to be admitted to the hospital. For this, the Delhi government will launch a new mobile app, Kejriwal said.

News English Title: Delhi government developed a mobile application for bed dashboard News latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x