16 December 2024 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

CBSE बोर्डाने दहावीचे निकाल सर्व शाळांना आणि विद्यार्थ्यांना इमेलवर पाठविले

CBSE class X, results

नवी दिल्ली, १५ जुलै : CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.

दरम्यान CBSE बोर्डाच्या वेबसाईटवर विद्यार्थी आणि पालकांना अनेक अडथळे येत आहेत. काही वेळ वेबसाईट बंद पडल्याचं पाहायला मिळालं. मात्र CBSE बोर्डाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार सर्व शाळांच्या ई-मेलवर विद्यार्थ्यांचे निकाल पाठविण्यात आले आहेत. त्याप्रमाणे विद्यार्थी निकाल शाळेतून निकाल प्राप्त करू शकतात असं म्हटलं आहे.

यंदा १८ लाख ८५ हजार ८८५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १८ लाख ७३ हजार १५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १७ लाख १३ हजार १२१ विद्यार्थी पास झाले आहेत. केंद्रीय मुनष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी बुधवारी निकाल जाहीर होईल अशी घोषणा केली होती. विद्यार्थी वेबसाईट्स याशिवाय एसएमएस, डिजीलॉकर आणि उमंग अ‍ॅपच्या माध्यमातून निकाल पाहू शकणार आहेत.

सीबीएसई दहावीच्या निकालात यंदा त्रिवेंद्रम विभागाने बाजी मारली आहे. त्रिवेंद्रम विभागाचा निकाल ९९.२८ टक्के लागला आहे. त्या पाठोपाठ चेन्नई दुसऱ्या (९८.९५ टक्के निकाल), बंगळुरू तिसऱ्या (९८.२३ टक्के निकाल) तर पुणे चौथ्या (९८.०५ टक्के निकाल) स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर अजमेर (९६.९३ टक्के निकाल) विभाग आहे.

 

News English Summary: CBSE class X results have been sent to all schools and can be checked from official e mails IDs created for each school. Students can obtain their results from schools.

News English Title: CBSE class X results have been sent to all schools on official e mails IDs created for each school News latest Updates.

हॅशटॅग्स

#CBSE(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x