12 December 2024 6:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

फडणवीस सरकारकडून मारहाण झालेला शेतकरी बच्चू भिडूंच्या मदतीने मुख्यमंत्र्यांकडे

CM Uddhav Thackeray, Minister Bachhu Kadu

मुंबई: शेतकरी रामेश्वर भुसारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आपल्यावर नोंदविण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यासंदर्भात भुसारे यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपली पीडित कहानी सरकार दरबारी मांडली. आपल्यावर मोठा अन्याय झाल्याची केविलवाणी भावना आणि संताप त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी, “काळजी करु नको, हे आपल सरकार आहे”, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी पीडित शेतकऱ्याला बोलून दाखवला.

यावर माहिती देताना मंत्री बच्चू कडू यांनी समाज माध्यमांवर पोस्ट करून म्हटलं आहे की, “हा चेहरा अनेकजण आज ओळखणार नाही, ३ वर्षा अगोदर औरंगाबाद येथील शेतकरी रामेश्वर भुसारे शेडनेटचे नुकसान भरपाई मागण्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यास भेटायला गेले व भरपाई मिळालीच नाही तर सुरक्षारक्षक, अधिकार्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्याला तुरुंगात टाकले तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांनी त्याला सोडवले.

३ वर्षानंतर अचानक त्याला पोलीस स्टेशन मधुन फोन येतो हजर व्हा नाहीतर अटक होईल. चौकशी केल्यावर कळले तत्कालीन सरकारनी चौकशीनंतर अधिकारी व सुरक्षारक्षकांना क्लिनचीट दिली व शेतकर्यावर गुन्हा दाखल केला. कलम ३०९ अंतर्गत भुसारेवर गुन्हा दाखल आहे. आज मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे व अजित दादा पवार यांच्या सोबत रामेश्वर भुसारे यांची भेट करुन दिली व गुन्हा माफ करायची विनंती केली. “काळजी करु नको, हे आपल सरकार आहे” असा शब्द मुख्यमंत्री उध्दवजी यांनी शेतकर्यास दिला.

 

News English Summery: Farmer Rameshwar Bhusare met Chief Minister Uddhav Thackeray. Bhusare met Chief Minister Uddhav Thackeray and Deputy Chief Minister Ajit Pawar through the Minister of State Bachu Kadu to tell the story of his victim’s government. He expressed his deep feelings and anger at the great injustice he had inflicted on us. At that time, Uddhav Thackeray spoke to the agrarian farmer saying, “Don’t worry, this is your government”. Informing this, Minister Bachu Kadu has posted on social media saying, “Many will not recognize this face today, 3 years ago, a farmer in Aurangabad visited Rameshwar Bhusare to meet the then Chief Minister to demand compensation for the shednet. He was imprisoned by the then opposition leaders Out of him.

 

Web News Title: Story Minister Bachhu Bhidu takes farmer with Chief Minister Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x