27 July 2024 10:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

शेकडो गुन्हे दाखल करा | पण बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच - मनसे

Raj Thackeray, Vashi court

नवी मुंबई, ०६ फेब्रुवारी: नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाने वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे आज (शनिवार) वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. विशेष म्हणजे, राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी टोलनाक्यावरच पोस्टरबाजी केली आहे.

26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

दरम्यान “शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच..!”, असं ट्विट मनसेने केलं आहे. विशेष म्हणजे, ज्या वाशी टोल नाक्याची २०१४ साली तोडफोड करण्यात आली होती. त्याच टोल नाक्यावर यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आलं होतं. अनेक वेळा न्यायालयात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे आता बेलापूर न्यायालयाने राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे सकाळी 11 वाजता राज ठाकरे नवी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीकडे सर्वांचं लक्ष आहे.

 

News English Summary: Belapur court has issued a warrant against MNS president Raj Thackeray in the Vashi Tolnaka vandalism case in Navi Mumbai. Therefore, Raj Thackeray will appear in Vashi court today (Saturday). In particular, Mansainiks have put up posters on Tolnaka to welcome Raj Thackeray.

News English Title: Raj Thackeray will appear in Vashi court today after warrant issued against him news updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x