27 July 2024 7:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

VIDEO: आशिष शेलारजी भाजप निवडणूक लढवतं; मग हे नेते काय बोलत आहेत ईव्हीएम'वर?

Ashish Shelar, MNS, Raj Thackeray

मुंबई: ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरनं निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी गुणवत्ता असलेल्या आमदार-पदाधिकारी व अन्य नेत्यांना भाजपात सुरू असलेला प्रवेश आता बंद झाला असला तरी विदर्भातील नेत्यांचे आम्ही स्वागत करू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले आहे. ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका घेण्यासाठी आंदोलन करणे हे अविश्वास दर्शविण्यासारखे आहे. ते न करता आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी विरोधकांना दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, एनसीपी नेते जयंत पाटील, छगन भुजबळ, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण ईव्हीएमला विरोध दर्शवत आहेत. विरोधकांची पत्रकार परिषदही पार पडणार आहे. आगामी निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी होते आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी ईव्हीएमला विरोध करणाऱ्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे म्हटले आहे.

निवडणूक आयोगाला घटनात्मक अधिकार असून निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या, की ईव्हीएमवर हे आयोगानेच ठरवायचे आहे. घटनात्मक अधिकार असलेल्या आयोगावर अशाप्रकारे जनमानसात संभ्रम निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मंत्री आशिष शेलार य़ांनी दिली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षांनी ईव्हीएमवर टीका करत आंदोलन छेडले आहे. यावर शेलार यांनी टीका केली आहे. पत्रकार परिषद घेऊन जे नेते ईव्हीएमच्या विरोधात बोलत आहेत त्यापैकी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे ईव्हीएम द्वारेच निवडून आले आहेत. त्यांनी आधी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मगच ईव्हीएम बाबत बोलावे, असे आव्हानच त्यांनी दिले आहे. मात्र भाजपचे जनतेतून निवडून आलेले नेते त्यात लालकृष्ण अडवाणी, रविशंकर प्रसार आणि सुब्रमनियम स्वामी यांनी देखील व रेकॉर्ड ईव्हीएम’वर गंभीर आरोप करत त्यात सहज फेरफार करता येऊ शकतात असं म्हटलं होतं. नेमके तेच आरोप आज राज ठाकरे करत आहेत, मात्र भाजपचे नेते मूळ विषय समजून न घेता विषयाला बगल देत भलत्याच प्रतिक्रिया देत आहेत असं निदर्शनास येते आहे.

दरम्यान आजच्या विरोधकांच्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की, ‘खरंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी यामध्ये सामील होणं अपेक्षित होतं’ आणि नेमका हाच धागा पकडून राज ठाकरे यांनी ही मागणी केली होती. त्यामुळे भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या ईव्हीएम’वरील शंकेने त्यांची देखील निवडणूक पद्धतीवर शंका होती असंच म्हणता येईल.

VIDEO: काय आरोप केले होते भाजपने ईव्हीएम’ला अनुसरून त्याचे पुरावे

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x