26 January 2022 10:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | काल 1 दिवसात या 10 पेनी शेअर्समधून तब्बल 10 टक्क्यांपर्यंत कमाई | यादी सेव्ह करा PPF Investment | या सरकारी योजनेत दररोज इतके पैसे जमा करून कोटीचा निधी जमा होईल | जाणून घ्या माहिती Cryptocurrency Investment | क्रिप्टोकरन्सीत गुंतवणुकीपूर्वी या गोष्टी नक्की तपासा | गुंतवणूक सुरक्षित आणि नफ्यात राहील Stock To BUY | मोठ्या नफ्यासाठी मल्टिबॅगर स्टॉक निओजेन केमिकल्स खरेदी करा | HDFC सिक्युरिटीजचा सल्ला Daily Rashi Bhavishya | 26 जानेवारी 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल 2022 Honda CBR650R | होंडा CBR650R 2022 भारतात लॉन्च | बुकिंग शुरू | वैशिष्ट्ये जाणून घ्या Gold Silver Prices Today | आज पुन्हा सोनं महागलं, पण चांदीचे दर घसरले | जाणून घ्या ताजी किंमत
x

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आता मोबाइल आचारसंहिता | काय आहेत कार्यालयीन वेळेतील नियम

Mobile use guidelines

मुंबई, २४ जुलै | राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या वेशभूषेबाबत मध्यंतरी केलेल्या मार्गदर्शक सूचना वादग्रस्त ठरल्या होत्या. आता त्यानंतर कर्मचाऱ्यांसाठी मोबाइल वापराबाबत आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. तसा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी जारी केला आहे.

राज्य शासनाचे सुमारे १ लाख २० हजार कर्मचारी, अधिकारी आहेत. त्यांच्यासाठी आता मोबाइल आचारसंहिता लागू झाली आहे. शासकीय कार्यालयात शक्यतो लँडलाइनचा वापर करावा, गरज भासली तरच मोबाइलचा वापर करावा, मोबाइलवर सौजन्यपूर्वक बोलावे, वाद घालू नये, अशा प्रकारच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत.

मोबाइलचा वापर करताना शक्यतो लघुसंदेशचा (टेक्स्ट मेसेज) वापर करावा, लोकप्रतिनिधी किंवा वरिष्ठ यांच्या आलेल्या दूरध्वनींना त्वरित उत्तरे द्यावीत, समाज माध्यमांचा वापर करत असताना वेळ आणि भाषा याचा तारतम्याने वापर करावा, असे या आचारसंहितेत नमूद आहे.

वैयक्तिक कॉल असेल तर?
वैयक्तिक काॅल असतील तेव्हा कार्यालयाच्या बाहेर जाऊन घ्यावे लागतील.

शासकीय दौऱ्यावर असाल तर?
कार्यालयीन कामांसाठी कर्मचारी दौऱ्यावर असेल तर मात्र मोबाइल बंद ठेवता येणार नाही.

सायलेंट मोड! वरिष्ठांच्या कक्षात मोबाइल सायलेंट मोडवर ठेवावेत, बैठकीत किवा वरिष्ठांच्या कक्षात मेसेज पाहणे टाळावे, असे यामध्ये बजावण्यात आलेले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Mobile use guidelines for state government employees during working hours news updates.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x