29 March 2024 4:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Power Share Price | अदानी पॉवर आणि रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मोठा करार, शेअरमध्ये मजबूत वाढीचे संकेत Skipper Share Price | अल्पावधीत 510 टक्के परतावा देणारा शेअर खरेदीला ऑनलाईन धावपळ, नेमकं कारण काय REC Share Price | 1 वर्षात REC शेअरने 292% परतावा दिला, आता एका सकारात्मक बातमीने शेअर्स खरेदीला गर्दी Reliance Share Price | खुशखबर! भरवशाचा रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर देईल 55 टक्केपर्यंत परतावा, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत Reliance Power Share Price | शेअरची किंमत 28 रुपये, अवघ्या 15 दिवसांत 40% परतावा देणारा स्टॉक लवकरच मल्टिबॅगर? IREDA Share Price | टेक्निकल चार्टवर IREDA स्टॉकची सपोर्ट लेव्हल तज्ज्ञांकडून जाहीर, स्टॉक पुढे घसरणार की तेजीत येणार? NHPC Share Price | टेक्निकल चार्टवर NHPC शेअर कोणते संकेत देतोय, सकारात्मक उपडेटनंतर तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?
x

मुस्लिम व्यक्ती ४ विवाह करू शकतात | हिंदू व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर काय चुकलं?

Karni Sena, Ajaysingh Sengur, Dhananjay Munde

मुंबई, १३ जानेवारी: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. बलात्काराच्या आरोपानंतर मुंडेेच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. असे असले तरीही या पोस्टनंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची माहिती या पोस्टमधून समोर आली आहे.

त्यानंतर भाजपच्या महिला आघाडीने यावर टिपणी करताच त्यांना प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भारतीय जनता पक्षाच्याच अनेक नेत्यांची कोंडी होईल, अशी खोचक टिप्पणी काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली. कारण भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता पुन्हा धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ करणी सेनेकडून देखील समर्थन मिळताना दिसत आहे.

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टमध्ये करुणा शर्मा यांच्याशी लग्न केल्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही. करुणा शर्मा आपली पत्नी असल्याचा कोणताही दावा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केल्यानुसार त्यांचे एकच लग्न झाले आहे.

महाराष्ट्र करणी सेनेचे अजय सिंह सेंगर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा धनंजय मुंडे यांना लागू होऊ शकत नाही. त्यांनी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही. मुस्लिम व्यक्ती ४ विवाह करू शकतात मग हिंदू व्यक्तीने दुसरं लग्न केलं तर काय चुकलं? असा सवाल महाराष्ट्र करणी सेनेचे अजय सिंह सेंगर यांनी उपस्थित करत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. राज्यघटना सगळ्यांनाच समान आहे. द्विभार्या प्रतिबंधक कायदा निरर्थक ठरला आहे. सर्व धर्मांना विवाहाचे वेगवेगळे बंधन असू शकत नाही. फक्त हिंदू धर्मालाच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार नाही असं सेंगर यांनी म्हटलं आहे. त्याचसोबत पहिल्या पत्नीपासून सुख मिळत नसेल तर मुस्लिमांप्रमाणे दुसरं लग्न करू शकतात.

 

News English Summary: Ajay Singh Sengar of Maharashtra Karni Sena has commented in this regard. The Double Duty Prevention Act cannot apply to Dhananjay Munde. He did not violate any law. Muslims can get married 4 times, so what is wrong if a Hindu gets remarried? This question has been raised by Ajay Singh Sengar of Maharashtra Karni Sena and has followed Dhananjay Munde.

News English Title: Karni Sena leader Ajaysingh Sengur supported Dhananjay Munde news updates.

हॅशटॅग्स

#Dhananjay Mundey(51)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x