23 January 2021 6:29 PM
अँप डाउनलोड

पुरुष नेत्याशी संपर्क असेल तरच महिलांना निवडणुकीचं तिकीट दिलं जातं - रेखा शर्मा

National Womens Commission, president Rekha Sharma, womens in politics

मुंबई, १३ जानेवारी: महिलेला कोणतीही निवडणूक लढवायची असल्यास तिचा पुरुष नेत्याशी संपर्क असणं गरजेचं आहे. असं असेल तरच महिलांना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिले जाते,’ असं खळबळजनक विधान राष्टीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा केलं. त्या हैदराबादमध्ये मौलाना आझात नॅशनल उर्दू महाविद्यालयाच्या महिला अभ्यास केंद्राने आयोजित केलेल्या एका वेबिनारमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या राजकारणातील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

BhagyaVivah Marathi Matrimonial

यावेळी बोलताना रेखा शर्मा यांनी महिलांच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले. त्यांनी सरकारमधील महत्त्वाच्या खात्यावर अनेक महिला असल्याचे सांगितले. मात्र ही संख्या अतिशय कमी असल्याचे म्हणत ही बाब चिंता वाढवणारी असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच, महिलांना राजकारणात योग्य प्रतिनिधित्व मिळण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्यांच्यावरोधात गंभीर आरोप असतात, अशा उमेदवारांना विविध पक्षांकडून आवर्जून तिकीट दिले जाते,” असं निरीक्षण त्यांनी नोंदवत त्यांनी भारतातील राजकीय पक्षांवर टीका केली आहे.

तत्पूर्वी म्हणजे प्रताप सरनाईक यांनी कंगना रानौतच्या संदर्भात एक ट्विट केलं असता त्याप्रकरणात रेखा शर्मा यांनी देखील उडी घेतली होती. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उडी घेत शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. यासाठी रेखा शर्मा यांनी Whats App चा स्क्रिनशॉटही शेअर केला होता.

तसेच महिला आयोगाच्या ट्विटर अकाऊंटवरून केलेल्या वक्तव्यात रेखा शर्मा यांनी महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ प्रकरणांत वाढ झाल्याचा दावा केला होता. अधिकृत ट्विट हॅन्डलवरून रेखा शर्मा आणि राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भेटीचा एक फोटोही जाहीर करण्यात आला होता. अध्यक्ष रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन महिलांची सुरक्षितता, कोविड सेंटरमध्ये होणारा महिलांचा लैंगिक छळ आणि बलात्कार प्रकरणं तसंच वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणांसंबंधी चर्चा केली’ असं त्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

 

News English Summary: If a woman wants to contest any election, she needs to have contact with a male leader. Only then are women given tickets to contest elections, ‘said Rekha Sharma, chairperson of the National Commission for Women. She was speaking at a webinar organised by Maulana Azad National Urdu College’s Center for Women’s Studies in Hyderabad. This time, she expressed concern about the current state of women’s politics.

News English Title: National Womens Commission president Rekha Sharma on womens representation in politics news updates.

हॅशटॅग्स

#RapeCase(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x