14 May 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास केंद्राची परवानगी

Corona Crisis, Covid 19, Union Home Ministry, Migrants Labours

नवी दिल्ली, २९ एप्रिल : लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.

गृह मंत्रालयाच्या आदेशात म्हटले आहे की, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या कामासाठी नोडल अधिकारी नेमतील आणि मग हे अधिक आपल्या इथे अडकलेल्या लोकांची नोंदणी करतील. ज्या राज्यांदरम्यान वाहतूक होणार आहे. तिथे हे अधिकारी एकमेकांशी संपर्कात राहतील. रस्ते मार्गाने या नागरिकांची ने-आण केली जाईल.

करोनानुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले असून अनेक लोक आपल्या घरापासून दूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. यामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांनी तर आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अनेक राज्यांनी अडकलेल्या कामगार आणि इतरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी ट्रेन सुरु कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कामगार, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

 

News English Summary: The Union Home Ministry has taken a major decision to allow migrant workers, students, tourists and religious pilgrims, who have been stranded in various states for the past 36 days due to the lockdown, to return home. According to the decision, these stranded citizens will now be able to travel interstate. The Union Home Ministry has directed the state government as well as the Union Territories to set up a nodal authority to send these citizens to the state.

News English Title: Story Union Home Ministry allowed interstate travel for stranded people due to Corona lockdown News Latest Updates.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x