11 December 2024 11:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

परराज्यातील गरजू कामगारांसाठी राज्यात २६२ मदतकेंद्र सुरु; राहण्याची-जेवणाची सोय

Corona Crisis, Lock Down, Relief Camp for Migrants

मुंबई, २९ मार्च: केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाला लॉकडाऊनदरम्यान प्रवासी कामगारांना रोखण्यासाठी प्रभावीपद्धतीने राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान कॅबिनेट सचिव राजीव गोबा आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शहरांत आणि राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे.

कोरोना विषाणूमुळे फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कामगारांनी आपले स्थलांतर सुरु केले आहे. प्रत्येकाला आपल्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. कृपा करुन गोंधळून जाऊन मोठी चूक करु नका. जिथे आहात तिथेच थांबा. महाराष्ट्र सरकार तुमच्या राहण्याची आणि जेवण्याची सोय करेल, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता. गर्दी करुन नवीन संकट निर्माण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले होते.

मात्र त्यानंतर राज्य सरकारने अशा गरजूंसाठी संपूर्ण राज्यात एकूण २६२ मदतकेंद्र उभे केले आहेत. त्यामध्ये ७०३९९ परराज्यातील गरजू कामगारांच्या राहण्याची तसेच जेवण्याची सोय राज्य सरकारने केली आहे. त्यासंदर्भात अधिकृत ट्विट करत मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली आहे.

 

News English Summary: Due to the corona virus, workers have started their migration not only in the state but all over the country. Everyone wants to go to their hometown. Please don’t be confused and make a big mistake. Wait wherever you are. Chief Minister Uddhav Thackeray has said that the Maharashtra government will facilitate you to stay and eat. He appealed to the crowd not to create a new crisis. However, since then the state government has set up 262 relief camp across the state for such needs. The state government has provided accommodation and meals to 70399 needy workers in the State. The Chief Minister’s Office has informed the official tweet.

 

News English Title: Story Relief camp has been started for migrants workers moving outside state during corona crisis lock down News latest updates.

हॅशटॅग्स

#UddhavThackeray(413)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x