12 December 2024 3:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मनसेच्या काळातील बोटॅनिकल गार्डनमुळे पालिकेला मिळतो ३ महिन्याला ४० लाखाचा महसूल

MNS, Raj Thackeray, Devendra Fadanvis, BJP

नाशिक : सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नाशिक महापालिकेतील सत्ताकाळातील महत्व नाशिकरांना देखील जाणवत असेल असं चित्र आहे. मधील २-३ वर्षांपासून भाजपचा सत्ताकाळ अनुभवणाऱ्या नाशीकरांना ते महत्व पटणे सुद्धा महत्वाचे आहे. दरम्यान, राज ठाकरे ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने दिलेली आश्वासने आणि मोदी-शहांची वक्तव्ये यांचा स्क्रीन वर लेखाजोखा मांडत होते आणि भाजप तोंडघशी पडत होती. सध्या नाशिकच्या न केलेल्या विकासाचा व्हिडीओ” अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत आहेत आणि भाजप वारंवार तोंडघशी पडत आहे आणि नाशिक दत्तक घेणारे फडणवीस लोकसभेच्या प्रचारात भाषणबाजी करून पुन्हा दिसेनासे झाले आहेत.

ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या नावे नाशिकच्या न केलेल्या विकासाच्या बातम्या पसरवत आहेत, त्यांच्या माहितीसाठी RTI अंतर्गत मागविलेली एक माहिती समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात येत आहे. राज ठाकरेंनी नाशिक मनपात सत्ता असताना तिथे एक बोटॅनिकल गार्डन उभे केले होते. या गार्डनमधील उत्पन्नाबाबत २०१७ मध्ये माहिती अधिकारात जी माहिती मागविली त्यानुसार २०१७ च्या जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या ३ महिन्यात बॉटनिकल गार्डन मधून पर्यटक शुल्काच्या रूपात मिळालेली रक्कम ३९,५८,३१० रुपये इतकी होती.

विशेष म्हणजे या गार्डनची उभारणी पूर्णपणे CSR फंडातून झाली असल्याने नाशिककरांचा किंवा नाशिक मनपाचा एकही रुपया खर्च झाला नाही. महिन्याला लाखो रुपये मनपाला मिळवून देणारा हा प्रकल्प ठरला आहे. विकास कसा करावा याचे हे उदाहरण वाचून भाजप कार्यकर्ते पुन्हा समाज माध्यमांवर तोंडघशी पडल्याचे पाहायला मिळत आहे.

काय आहे ती नेमकी माहिती?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x