15 December 2024 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव 900 रुपयांनी धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

जाहीर माफी मागा | सुशांतच्या नातेवाईकाची संजय राऊतांना कायदेशीर नोटीस

Sushant Singh Rajput, Cousin Sends Legal Notice, Shivsena MP Sanjay Raut

मुंबई, १२ ऑगस्ट : सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरुन देशात चांगलंच राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. सुशांतच्या मृत्युप्रकरणात शिवसेना आणि भाजपा ऐकमेकांना लक्ष्य करत आहेत. त्यातच, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुशांतच्या कुटुबीयांसंदर्भात एक विधान केले होते. सुशांतच्या वडिलांचे दुसरे लग्न झाल्याचे सांगत सुशांत व त्याच्या वडिलांचे संबंध चांगले नव्हते, असा दावाही राऊत यांनी केला होता. आता, संजय राऊत यांच्या विधानावरुन सुशांतच्या कुटुंबीयांनी राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

वृत्तानुसार, सुशांतचा चुलत भाऊ नीरज कुमार याने संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नीरजने संजय राऊत यांना ४८ तासात जाहीर माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला तयार राहा असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यांनी दावा केला होता की, सुशांत सिंह राजपूत आणि त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यातील नातं फारसं चांगलं नव्हतं. संजय राऊत यांनी सामनामधून लेखातून हा दावा केला होता. सुशांत आपल्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नामुळे खूश नव्हता. सुशांत सिंह राजपूत किती वेळा आपल्या वडिलांची भेट घेण्यासाठी पाटण्याला गेला होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

 

News English Summary: Sushant’s cousin Neeraj Kumar Bablu has sent a legal notice to Sanjay Raut over his controversial remarks on the late actor’s family. He has asked Raut to apologize publicly in 48 hours or he might face legal action.

News English Title: Sushant Singh Rajput Cousin Sends Legal Notice To Shivsena MP Sanjay Raut News Latest Updates.

हॅशटॅग्स

#SushantSinghRajput(113)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x