14 December 2024 8:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

क्वॉरंटाइन कँम्पमधून रुग्णांचे पलायन सुरु; अखेर मनसेची 'ती' मागणी योग्य ठरली

News latest Updates, Corona Crisis

मुंबई, २३ मार्च: करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते.

हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले. अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.

तसेच दोन दिवसांपूर्वी अकोल्यातील कोरोनाचे तीन संशयित रुग्ण गायब झाल्यावर त्या तिघांची नावं जाहीर करून त्यांचा शोध सुरु झाला होता. मात्र अशा संशयित रुग्णांची माहिती मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने जाहीर केल्यानंतर त्याच्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश देईल होते. मात्र आज नेमके तेच प्रकार सरकार मधील अधिकारी करत असल्याने स्वतः प्रशासनाचं मनसेच्या त्या मार्गावर अंमलबजावणी करत असल्याचं दिसत आहे.

तत्पूर्वी, कोरोनाग्रस्त रुग्णांची नावं जाहीर करा, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारकडे केली होती. कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण गुन्हेगार किंवा आरोपी नाहीत. याशिवाय त्यांना HIV सारख्या आजाराची लागण झालेली नाही. त्यांना कुणीही वाळीत टाकणार नाही, असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं होतं. कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाचं नाव जाहीर केल्यास यातून जनजागृती वाढेल. आपला समाज यातून सकारात्मकच भूमिका घेईल, असं संदिप देशपांडे म्हणाले होते.

 

News English Summery:  The 15 suspected patients treated with coronas escaped with quarantine. However, the administration has succeeded in detaining these 15 persons. All of them had come from Dubai to Mumbai. All of them are originally residents of Punjab. A quarantine stamp was struck on their hands. They were kept in quarantine. There were also strong warnings not to move. But these 15 escaped the quarantine camp. In the dark they grabbed the locals and landed in the mud. They were taken into custody, sources said. A team was created by the police, the district collector and the municipal authorities to capture the 15 men.

 

News English Title:  Story 15 Suspected escape from quarantine in Mumbai brought back by authority News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x