28 January 2023 6:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 29 जानेवारी 2023 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Hindenburg Report Adani Group | अदानी ग्रुपबाबत हिंडेनबर्गचा अहवाल 'अत्यंत विश्वासार्ह'!, दिग्गज अब्जाधीश विल्यम एकमन Numerology Horoscope | 29 जानेवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Bank Balance on WhatsApp | तुमच्या व्हॉट्सॲपवर समजेल तुमचा बँक बॅलन्स, जाणून घ्या प्रक्रिया Speciality Restaurants Share Price | रेस्टॉरंट चेन चालवणाऱ्या कंपनीच्या शेअरने 170% परतावा दिला, आता स्टॉक नवीन टार्गेटच्या दिशेने Poonawalla Fincorp Share Price | करोडपती केलं या शेअरने! फक्त 22 हजारांच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा, स्टॉक पुन्हा तेजीत Rama Steel Tube Share Price | परतावा असावा तर असा! या शेअरने 6 महिन्यांत 142% परतावा दिला, बाजार कमजोर पण स्टॉक तेजीत
x

मोलकरणीला कोरोना झाल्याचे सिद्ध..श्रीमंतांमार्फत कोरोना झोपडपट्ट्यांमध्ये पोहोचला

Corona Crisis, News Latest Updates

मुंबई, २३ मार्च: करोनावर उपचार घेत असलेले १५ संशयित रुग्ण क्वॉरंटाइनमधून पळाले होते. मात्र, या १५ जणांना ताब्यात घेण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हे सर्वजण दुबईहून मुंबईत आले होते. हे सर्वजण मूळचे पंजाबचे रहिवासी आहेत. त्यांच्या हातावर क्वॉरंटाइनचा स्टँम्प मारलेला होता. त्यांना क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आले होते. तिथून न हालण्याची सक्त ताकीदही देण्यात आली होती. मात्र हे १५जण क्वॉरंटाइन कँम्पमधून पळाले.

अंधेरीत त्यांनी लोकल पकडली आणि खारमध्ये उतरले. त्यांना खारमध्येच ताब्यात घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या १५ जणांना पकडण्यासाठी पोलीस, जिल्हाधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांनी एक टीम तयार केली होती.

अशा धक्कादायक घटना घडत असताना दुसऱ्या बाजूला अजून एक गंभीर बातमी समोर आली आहे. ७ मार्च रोजी मुंबईतील मध्यवर्ती भागामध्ये राहणारा ४९ वर्षीय व्यक्ती अमेरिकेहून परत आला. त्यानंतर त्या व्यक्तीच्या घरी ही महिला साफसफाईसाठी रोज जात होती. दहा दिवसानंतर म्हणजे १७ मार्च रोजी या व्यक्तीला करोना झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या इतर चार व्यक्तींचीही चाचणी करण्यात आली. यामध्ये त्याची आई, मोलकरणी आणि अन्य दोन व्यक्तींचा समावेश होता. त्यापैकी केवळ मोलकरणीला करोना झाल्याचे सिद्ध झालं.

मुंबईमधील एका मोठ्या झोपडपट्टीमध्ये सदर ६८ वर्षीय महिला राहत असल्याने अनेकांशी तिचा संपर्क झाला असण्याच्या भीतीने सरकारची झोप उडाली आहे. संबंधित महिलेच्या घरी तपास अधिकारी गेले असता तिच्या मुलाने, “आमची चाचणी करण्यासाठी तुम्ही इथे का आलात… आम्ही तर गरीब आहोत, आम्ही झोपडपट्टीत राहतो. हा आजार आम्हाला कसा होईल,” असा सवाल अधिकाऱ्यांना विचारला. या महिलेला करोना असल्याचे १८ मार्च रोजीच्या चचणीमध्ये उघडं झालं. ही महिला मुंबईतील एका मोठ्या झोपडपट्टीमध्ये २५० स्वेअरफुटांच्या घरात राहत असल्याने तिच्या संपर्कात आलेल्यांची संख्या अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

झोपडपट्टीमध्ये करोनाचा रुग्ण अढळल्याची भारतातील हे पहिलेच प्रकरण असण्याची शक्यत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही महिला जेथे राहते त्या झोपडपट्टीमध्ये एक स्वेअर किलोमीटर परिसरात २३ हजार जण राहतात. त्यामुळे करोनाचा संसर्ग झाल्यानंतर चाचणी करुन करोना झाल्याचे सिद्ध होण्याच्या १० दिवसांच्या कालावधीमध्ये ही महिला कोणाकोणाला भेटली हे शोधणे अधिकाऱ्यांना कठीण जात आहे. त्याहून कठीण काम म्हणजे या महिलेने जे सार्वजनिक स्नानगृह वापरलं त्या स्नानगृहामध्ये अंघोळ केलेल्या महिलांनाही करोना झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

News English Summery:  The 68-year-old woman lives in a large slum in Mumbai, and the government has fallen asleep for fear of being contacted by many. When the investigating officer went to the house of the woman concerned, her son said, “Why did you come here to test us … we are poor, we live in slums. “How will this illness get us,” asked the authorities. The March 18 trial for the woman was found to be of coronas. The woman, who lives in a 250-square-foot house in a large slum in Mumbai, is said to be more likely to be in contact with her. This is likely to be the first case in India that a coronary disease is found in a slum. What is shocking is that in the slum where this woman lives, there are 23,000 people living in a square kilometer area. Therefore, officers are finding it difficult to find out who met the woman within 10 days after the coronary infection was tested and proved to be coronary. Even more difficult is the fact that even women who have bathed in the bathroom who used this bathroom can not rule out the possibility of coronation.

 

News English Title:  Story corona virus case in a Mumbai slum officials hit tracking hurdle News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Mumbai(146)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x