ट्रम्प यांचा मोदी सरकारला झटका; 'व्यापार संधी' तोडली
वॉशिंग्टन : अमेरिकेने भारत आणि तुर्कस्तानशी असलेली व्यापार संधी (GSP) तोडली असून विशेष व्यापारी सूट देण्याचा दर्जा काढून घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज सिनेटमध्ये ही अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांच्या या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर जाणवणार असून अधिसूचना जारी झाल्यानंतर २ महिन्यांनी हा बदल लागू होणार आहे. GSP अंतर्गत अमेरिकेमध्ये भारताला करासंदर्भात विशेष सूट दिली जात होती. ठराविक रकमेच्या आयात मालावर अमेरिका आयातकर आकारत नव्हती.
अमेरिकेच्या जीएसपी योजनेचा भारत सर्वात मोठा लाभार्थी होता. ही योजना विकसनशील देशांसाठी लागू केली होती. यानुसार १९७० पासून भारताला ५.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच ४०,००० कोटी रुपयांच्या निर्यातीवर सूट मिळत होती. आता जीएसपीतून बाहेर केल्यानंतर भारताला हा फायदा होणार नाही.
ट्रम्प यांनी नुकतेच यावर भाष्य करत नाराजी व्यक्त केली होती. भारत हा अमेरिकी उत्पादनांवर अधिक आयात शुल्क आकारणारा देश आहे, असे मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केले होते. किमान कर अथवा बरोबरीचा कर असावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कंजर्व्हेटिव्ह पॉलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्सला संबोधित करताना ते बोलत होते. ट्रम्प म्हणाले की, भारत आमच्या देशावर अधिक शुल्क आकारतो. यावेळी ट्रम्प यांनी यावेळी भारतासारख्या देशांशी असलेल्या जागतिक आणि व्दिपक्षीय संबंधांसह विविध मुद्यांवर भाष्य केले. भारत समसमान कर आकारेल याबाबत शाश्वती नसल्याने भारताचा हा दर्जा काढून घेतल्याचे ट्रम्प यांनी सिनेटमध्ये सांगितले.
United States Trade Representative: At direction of President Donald Trump, US Trade Representative Robert Lighthizer announced that US intends to terminate India’s & Turkey’s designations as Beneficiary Developing Countries under Generalized System of Preferences (GSP) program pic.twitter.com/cMWnnb3vGV
— ANI (@ANI) March 5, 2019
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Sarkari Yojana | लेकीच्या भविष्याची चिंता मिटली; या 4 सरकारी योजना तुमच्या डोक्यावरचा भार हलका करतील, फायदाच फायदा
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News