12 December 2024 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

IRFC Vs RVNL Share Price | घसरणारे IRFC आणि RVNL शेअर्स 5 दिवसानंतर रुळावर, पण शेअर्सचे पुढे काय होणार?

IRFC Vs RVNL Share Price

IRFC Vs RVNL Share Price | मागील काही दिवसापासून रेल्वे कंपन्याचे शेअर्स आपल्या रुळावरून घसरले होते. मात्र आज हे शेअर्स पुन्हा आपल्या रुळावर परतले आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 237.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. तर इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांच्या घसरणीसह 138.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील 5 दिवसात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरमध्ये 13 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली आहे. तर IRFC स्टॉक 11 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 9.21 टक्के वाढीसह 250.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर आयआरएफसी कंपनीचे शेअर्स 13.13 टक्के वाढीसह 150.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

2024 या वर्षीच्या सुरूवातीपासून आतापर्यंत आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 39 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर याच काळात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची किंमत 30 टक्क्यांनी वाढली आहे. आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 345.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 56.05 रुपये होती.

आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 192.80 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 25.40 रुपये होती. आयआरएफसी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना अफाट नफा कमावून दिला आहे. मागील तीन वर्षांत आयआरएफसी कंपनीच्या गुंतवणूकदारांनी तब्बल 456 टक्के नफा कमावला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 360 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 239 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1089 टक्के परतावा कमावून दिला आहे. डिसेंबर 2023 तिमाहीत आरव्हीएनएल कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4 टक्के घट नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 326 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत कंपनीने 341 कोटी रुपये निव्वळ मग कमावला होता.

डिसेंबर 2023 तिमाहीत इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन कंपनीच्या निव्वळ नफ्यात 1.7 टक्के घसरण पहायला मिळाली आहे. या तिमाहीत कंपनीने 1,604 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,633 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRFC Vs RVNL Share Price NSE Live 13 February 2024.

हॅशटॅग्स

IRFC Vs RVNL Share price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x