28 May 2024 3:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

कुमारस्वामींनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

बंगळुरू : जेडीएसचे नेते एच. डी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजुभाई वाला यांनी एच. डी कुमारस्वामी यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाअंती भाजप जरी सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असला तरी त्यांनी बहुमत सिद्ध करण्यात अपयश आल्याने भाजपच्या मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर अखेर आज काँग्रेस आणि जेडीएसची युती अस्तित्वात येऊन जेडीएसचे नेते एच. डी कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आला तर उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे ठेवण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे आज संपन्न झालेल्या शपथ विधीला विरोधकांची एकजूट पाहावयास मिळावी. कुमारस्वामी यांच्या शपथविधीला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बसपाच्या अध्यक्षा मायावती, सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार, डावे नेते सीताराम येचुरी, डी. राजा, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव, द्रमुकच्या नेत्या कनिमोझी तसेच नुकतेच एनडीएमधून बाहेर पडलेले टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू सर्व दिग्गज राजकारण्यांची विशेष उपस्थित होती.

 

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x