12 December 2024 9:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

मानहानी प्रकरण | कंगनाला धक्का | जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली

Kangana Ranaut

मुंबई, ०९ सप्टेंबर | अभिनेत्री कंगना रणौतला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. वकिल रिझवान सिद्दीकी यांनी न्यायालयात कंगनाची तर वकिल जय के भारद्वाज यांनी जावेद अख्तर यांची बाजू मांडली. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती डेरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

मानहानी प्रकरण, कंगनाला धक्का, जावेद अख्तर यांच्याविरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली – Bombay high court dismisses plea by axtrees Kangana Ranaut challenging Javed Akhtar defamation case :

जावेद अख्तर यांनी कंगना रणौतच्या विरोधात मानहानीचा खटला उच्च न्यायालयात दाखल केला होता. हा खटला रद्द करण्याची मागणी करणारी याचिका कंगनाने न्यायालयात दाखल केली होती. यावर 1 सप्टेंबरला सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने आपला आदेश राखीव ठेवला होता. तो आज घोषित करण्यात आला.

काही वाहिन्यांवर जावेद अख्तर यांच्या विरोधात वक्तव्य कंगनाने केले होते. ऋतिक रोशन संदर्भात जावेद अख्तर हे दबाव आणत असल्याचा आरोप कंगनाने केला होता. यावर जावेद अख्तर यांनी कायदेशीर पाऊल उचलले होते. त्यांनी कंगनाविरोधात मानहानीचा दावा करणारी याचिका दाखल केली आहे.

काय म्हटलं होते कंगनाने?
कंगनाने तिच्या आरोपात म्हटले होते, की जावेद अख्तर यांनी मला त्यांच्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मला समजावण्याचा प्रयत्न केला, की ऋतिक रोशन व त्याचे वडील ही मोठी माणसे असून जर तू त्यांची माफी मागितली नाही तर ती माणसं तुला सोडणार नाहीत. तुला तुरुंगात पाठवतील व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना तुझ्याशिवाय आणखी कोणी जबाबदार नसेल. त्यानंतर कदाचित तुझ्याकडे कुठला पर्याय सुद्धा उरणार नाही व तुला आत्महत्या करावी लागेल, अशा शब्दात जावेद अख्तर यांनी मला धमकविण्याचा प्रयत्न केला होता. कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही तिच्या सोशल माध्यम अकाऊंटवर जावेद अख्तर यांच्या विरोधात अशाच प्रकारचे आरोप केले होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Bombay high court dismisses plea by axtrees Kangana Ranaut challenging Javed Akhtar defamation case.

हॅशटॅग्स

#KanganaRanaut(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x