20 September 2021 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Javed Akhtar Vs Kangana Ranaut | अटक वॉरंटच्या शक्यतेने कंगना रणौत अंधेरी कोर्टात हजर राज्यसभा निवडणुकीमार्फत भाजपाची मुंबई महापालिकेतील उत्तर भारतीय मतांसाठी मोर्चेबांधणी | संजय उपाध्याय यांना उमेदवारी Gold Price | सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण | हा आहे आजचा भाव Pitru Paksha 2021 | कोरोना काळात ज्यांचा अंत्यसंस्कार योग्यरित्या करता आला नाही | त्यांच्या शांतीसाठी 'या' विधी Kangana Ranaut Vs Javed Akhtar | कंगना आज न्यायालयात हजर न राहिल्यास तिच्या विरोधात अटक वॉरंट निघण्याची शक्यता TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस मी कोल्हापूरात भाजप भुईसपाट केली | चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे लढावं - हसन मुश्रीफ
x

देशात कोरोना पसरतोय? | दुसरीकडे 5 राज्यांतील निवडणुकीच्या तारखा आज जाहीर होण्याची शक्यता

Assembly elections, Five states

नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी: देशातील 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा अखेर आज संध्याकाळी जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने यासाठी 4.30 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले. पश्चिम बंगाल, तमिलनाळू, आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीत या निवडणुका होणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यातील केवळ एक राज्य आसाममध्ये भाजपची सत्ता आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलला तब्बल 211 जागा मिळाल्या होत्या. तर डावे आणि काँग्रेस आघाडीला 76 जागा मिळाल्या होत्या. केवळ 3 जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने यावेळी मात्र पश्चिम बंगालमध्ये आपली ताकद पणाला लावली आहे.

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 42 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीत यंदा सत्ताच स्थापन करू असे भाजपचे म्हणणे आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत दरवेळी डावे विरुद्ध तृणमूल पाहायला मिळत होते. भारतीय जनता पक्षाला यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र ही निवडणूक भाजप विरुद्ध तृणमूल अशी रंगली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंट यांच्यात आघाडी शक्य आहे. फुरफुरा शरीफ यांच्या इंडियन सेक्युलर फ्रंटला 30 जागा दिल्या जाणार अशीही चर्चा आहे.

 

News English Summary: The dates for the Assembly elections in five states of the country will finally be announced this evening. The Election Commission has announced that it will hold a press conference at 4.30 pm. Elections will be held in West Bengal, Tamil Nadu, Assam, Kerala and Union Territory of Puducherry. Remarkably, the BJP is in power in only one of these states, Assam.

News English Title: The dates for the Assembly elections in five states of the country will finally be announced this evening news updates.

हॅशटॅग्स

#ElectionCommission(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x