मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आजच्या पहिल्या टप्प्यात राज्यात नागपूर, वर्धा, भंडारा, रामटेक, गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये ११ एप्रिलला मतदान होणार असल्याने उमेदवारी अर्ज भरण्याची घाई दिसून येत आहे. काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह स्वतः मुख्यमंत्रीही अर्ज भरताना उपस्थित असणार असल्याचे समजते.

पहिल्या टप्प्यासाठी वीस राज्यांतील ९१ जागांवर मतदान होणार असून त्यासाठी आज अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज शेवटचा दिवस असल्याने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अभिनेते राज बब्बर आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक दिग्गज अर्ज भरणार आहेत.

Form submission late date for first phase loksabha election in Maharashtra