27 July 2024 11:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात दर महिना रु.20,050 येतील, महिना खर्चाची चिंता मिटेल Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा
x

राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय असा आरोप, पण मुख्यमंत्री शिंदे भाजपाच्या सांगण्यावर शिवसेना संपवत आहेत?, ओवळा-माजीवडा सुद्धा भाजपकडे?

CM Eknath Shinde

MLA Pratap Sarnaik | शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी आम्हीच खरी शिवसेना म्हणणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने दावा सांगितला होता, मात्र भाजपने ही जागा हिसकावत शिंदे गटाला धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे भाजपसमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं चालत नसल्याचं वृत्त आहे. अंधेरी पूर्वेची ही जागा भाजपकडून विवादित माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना जाहीर करण्यात आली असून तशी पोश्टरबाजी मतदारसंघात सुरु झाली आहे.

गुजराती उमेदवार मुरजी पटेल यांचे नगरसेवकपद न्यायालयाकडून बनावट जात प्रमाणपत्रामुळे रद्द करण्यात आले होते, आता त्यांच्यावर भाजपची भिस्त आहे. या विधानसभा क्षेत्रात अनेक एसआरए प्रकल्प बाधितांचे त्यांच्यावर गंभीर आरोप असून ते त्यांच्या कार्यालयात नेहमी तगादा लावत असताना. इथल्या झोपडपट्टीत त्यांच्याविरोधात अनेकांमध्ये रोष आहे. मुरजी पटेल यांचे आशिष शेलार यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत.दरम्यान, प्रत्यक्ष राज्यातील विधानसभा निवडणुका येतील तेव्हा शिंदे गटातील अनेकांचे मतदारसंघ स्थानिक भाजप नेते स्वतःकडे खेचतील आणि शिंदे समर्थकांची निवडणुकीच्या तोंडावर मोठी कोंडी होईल असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

आता ठाण्यातील ओवळा-माजीवडा हा शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांचा विधानसभा मतदारसंघ भाजप स्वतःकडे खेचणार आहे असं खात्रीलायक वृत्त आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रताप सरनाईक यांना हा मतदारसंघ भाजपाला सोडण्यासाठी आग्रह केला आहे. त्यानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे आमदार सरनाईक यांना पुन्हा चुका अशी फेऱ्यात अडकविण्याचा धमकी सुद्धा देण्यात आल्याचं वृत्त आहे. ठाण्यातील ओवळा-माजीवडा या विधानसभा मतदारसंघातील आमदार सरनाईक यांच्या समर्थकांना फोडून भाजपात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ही खबर लागताच आमदार सरनाईक आणि शिंदे यांच्यात फोनवर भांडण झाल्याचं वृत्त आहे. शिंदे यांनी घेतलेल्या बंडखोरीच्या निर्णयाने ते सध्या स्वतःची आणि मुलाची अधिक राजकीय करत आहेत असं समर्थक पदाधिकारी पदयाआड सांगत आहेत. त्यामुळे स्वतःच्या सार्थकांना अंधारात ठेऊन आयत्यावेळी अनेकांचा घात केला जाऊ शकतो अशी दोन प्रकरणं काही दिवसातच समोर आली आहेत.

40 समर्थकांसाठी धोक्याची घंटा?
आम्हीच शिवसेना असा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या वाट्याच्या पहिल्याच मतदारसंघावर (अंधेरी पूर्व) स्वतःच्या पातळीवर सौदेबाजी केल्याची चर्चा इथल्या शिंदे समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. तसेच यापढे भाजप शिंदेंच्या गोटातील अनेक जणांच्या आमदारकी तिकीट आयत्यावेळी भाजप नेत्यांना दिली जातील अशी चर्चा या मतदारसंघात शिंदे समर्थकांमध्ये सुरु झाली आहे. अशा विषयांवर शिंदेंचं ऐकलंच जातं नाही असं पदाधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शिंदे समर्थकांचा भविष्यकाळ आत्ताच दिसू लागला आहे अशी चर्चा आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली होती आणि त्यांना पाठीशी असल्याचा विश्वास दिला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Political clash between CM Eknath Shinde and MLA Pratap Sarnaik check details 30 September 2022.

हॅशटॅग्स

#CM Eknath Shinde(90)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x