5 June 2023 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Anmol India Share Price | मालामाल शेअर! अनमोल इंडिया शेअरने 843% परतावा दिला, आता एका शेअरवर 4 फ्री बोनस शेअर्स मिळणार My EPF Money | पगारदारांनो! EPF कट होतं असेल तर लक्ष द्या, हे लोकच काढू शकतात पैसे, या कागदपत्रांची असेल गरज Loksabha Election 2024 | 2024 लोकसभेसाठी 9 वर्षात गमावलेल्या मित्रपक्षांपुढे भाजप हात पसणार, भाजप गुजरात लॉबीवर कोण विश्वास ठेवणार? Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी झाले, तुमच्या शहरातील आजचे दर तपासून घ्या Sulochana Didi | निरागस अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींचे वृद्धापकाळाने निधन, त्या ९४ वर्षांच्या होत्या Cash Transactions | तुम्हीही खूप कॅश ट्रान्झॅक्शन्स करत असाल तर नियम जाणून घ्या आणि इन्कम टॅक्स नोटीस टाळा ATM Cash Withdrawal Limit | तुम्ही बँक ATM वापरता? प्रतिदिन पैसे काढण्याची मर्यादा बदलली, नवा नियम आणि रक्कम लक्षात ठेवा
x

राजस्थानात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि व्हिडीओ शूट : संतापाची लाट

राजस्थान : विकृती थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आधीच कठुआ आणि उन्नाव मधील बलात्काराच्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असताना आता राजस्थानमध्ये सुद्धा एका तरुणीवर तीन तरुणांनी बलात्कार करत त्याचा व्हिडियो शूट करून तो सर्वत्र व्हायरल केला असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जम्मू काश्मीर मधील कठुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नाव मधील सामूहिक बलात्काराची प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देश भरात आधीच संतापाची लाट उसळली आहे. त्यातच अजून एक भयंकर घटना राजस्थानात घडली आहे. भरतपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आणि बलात्कार करतानाचे व्हिडीओ शूट करत ते व्हायरल केल्याचे समोर आलं आहे.

विकृत बलात्कारी इतके निर्धास्त झाले आहेत की, सामूहिक बलात्कार करतात आणि त्याचा व्हिडीओ सुद्धा बिनदिक्कत समाजमाध्यमांवर व्हायरल करत आहेत. पीडित मुलीच्या वडिलांनी हलैना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेशाला रवाना झालं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1663)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x