20 June 2021 9:49 PM
अँप डाउनलोड

कठुआ बलात्काराचं समर्थन करणाऱ्या विकृत कर्मचाऱ्याची हकालपट्टी

कोच्ची : कठुआ बलात्कार प्रकरणी समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना कोटक बँकेतील एका कर्मचाऱ्याने बलात्काराचं विकृत समर्थन केल्याने अखेर कोटक बँकेने त्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

समाज माध्यमांवर जम्मूमधील कठुआ बलात्काराचं विकृत समर्थन करत चिमुकल्या पीडित मुलीबद्दल आक्षेपार्ह विधान या युवकाने केले होते. विष्णू नंदकुमार असं त्याचं नाव असून तो कोटक महिंद्रा बँकेत नोकरीला असल्याचे समोर आल्यावर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत होता. परंतु बँकेने स्पष्ट केलं आहे की, विष्णू नंदकुमारला त्याच दिवशी खराब कामगिरीच्या निकषावर नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. ज्या दिवशी त्याने ही विवादित पोस्ट समाज माध्यमांवर टाकली त्याच दिवशी त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले.

विष्णू नंदकुमारने चिमुरडीवर झालेल्या जम्मूमधील कठुआ बलात्काराचं समर्थन करणारी ती विवादित पोस्ट मल्याळम भाषेत होती. त्याने त्यात असं म्हटलं होतं कि, ‘उद्या भारताविरोधात मानवी बॉम्ब होण्यापेक्षा तिची हत्या झाली हे चांगलं. त्यानंतर समाज माध्यमांवर त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आणि अखेर कोटक बँकेच्या ते निदर्शनास येताच त्यांनी त्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1593)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x