अंबरनाथ : अंबरनाथचे शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांच्यावर स्थानिक मतदार संतापले आहेत. अंबरनाथच्या भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला आणि आमदार येथे दहा वर्ष फिरकलेच नसल्याचा संताप व्यक्त केला.

भीमनगर परिसरातील महिलांनी त्यांना शिवीगाळ करत आपला संताप व्यक्तं केला. शिवसेना आमदार बालाजी किणीकर दहा वर्ष झाली परंतु अंबरनाथच्या भीमनगर परिसरात फिरकले सुद्धा नाहीत. त्यामुळे जेंव्हा ते आल्याचे समजले तसं लगेचच भीमनगर परिसरातील स्थानिक महिलांनी त्यांना घेराव घातला आणि चांगलेच धारेवर धरले.

स्थानिक महिलांनी त्यांना चांगलेच सुनावल्याने आमदार बालाजी किणीकर यांना गप्प बसण्या शिवाय दुसरा मार्गच सुचला नाही. त्यांचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला आहे.

ambarnath females angry on shivsena mla balaji kinikar