24 October 2024 10:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NBCC Share Price | कंपनी ऑर्डरबुक मजबूत होऊनही शेअर घसरतोय, पुढे रॉकेट तेजी, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: NBCC NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत मोठी अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL NHPC Share Price | NHPC शेअरमध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, स्टॉक बाऊन्स बॅक करणार, कमाईची संधी - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर घसरतोय, स्टॉक चार्टवर महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

नाणार प्रकल्पग्रस्तांची 'राज भेट'

मुंबई : कोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा संपूर्ण कोकणात पेट घेण्याची शक्यता आहे. काल नाणार प्रकल्पग्रतांनी राष्ट्रवादीचे सर्वेसेवा शरद पवार यांची भेट घेतली आणि आज ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

कोकणातील नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पाविरोधात या संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते राज ठाकरे यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेणार आहेत. स्थानिकांनी विरोध तीव्र करण्यासाठी ठरवले असून त्यासाठीच ही भेट असल्याचे समजते. मागे राज ठाकरे यांनी रत्नागिरी दौरा करून प्रत्यक्ष ठिकाणी प्रकल्पग्रस्तांची भेट घेतली होती.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होणारच असं विधान केल्याने परिस्थिती अधिकच चिघळण्याची चिन्ह आहेत. सौदी अरेबियातील मोठी कंपनी अराम्को या कंपनीत मोठी गुंतवणूक करणार असल्याचे समोर आले आहे. तर या ऑईल रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणाच्या निसर्गाला आणि नद्यांना मोठी हानी पोहोचणार असल्याचे मत व्यक्त केलं जात आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thakare(62)#Raj Thakarey(78)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x