18 February 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | 36 टक्के कमाईची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 50 रुपयांच्या खाली घसरणार, 6 महिन्यात 37% घसरला शेअर - NSE: SUZLON SBI Mutual Fund | SBI फंडाच्या मजबूत AUM असणाऱ्या योजना, डोळेझाकुन पैसा गुंतवा, 23 ते 34 लाख परतावा मिळेल SBI Mutual Fund | खुशखबर, आता महिना अवघ्या 250 रुपयात म्युच्युअल फंडातून पैसा वाढवा, SBI जन-निवेश SIP योजना लाँच EPFO Pension Money | खाजगी कंपनी पगारदारांना महिना 7500 रुपये ईपीएफ पेन्शन मिळणार, अपडेट जाणून घ्या BEL Share Price | डिफेन्स शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर तेजीत, तज्ज्ञांकडून मोठे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: RELIANCE
x

PPF Investment Formula | PPF मध्ये फक्त पैसे गुंतवू नका, या फॉर्म्युल्याने PPF बचत करा, मिळेल करोडमध्ये परतावा

PPF Investment Formula

PPF Investment Formula | सरकार गुंतवणूकदारांसाठी नवनवीन योजना काढत आहे. बहुतांश व्यक्ती सर्वाधिक परतावा मिळवून देणारी आणि जबरदस्त टॅक्स सेविंग करणारी योजना शोधतात. तुम्हाला देखील एका सुरक्षित फंडात पैसे गुंतवायचे असतील तर, पब्लिक प्रॉव्हिडंट फंडात पैसे गुंतवा. PPF फंडात पैसे गुंतवताना तुम्ही एका जबरदस्त फॉर्मुलाचा वापर करू शकता.

PPF चा फॉर्म्युला काय आहे :

तुम्हाला पीपीएफ खात्यात म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड तयार करायचा असेल तर, 15+5+5 या फॉर्म्युलाचा वापर करावा लागेल. तुम्ही पीपीएफ खात्यात एकूण 15 वर्षे गुंतवणूक करू शकता. पीपीएफमध्ये तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करून 1.5 लाख रुपयांपर्यंत पैसे गुंतवू शकता. सध्याच्या घडीला पीपीएफ खात्यावर तुम्हाला 7.1% दराने व्याजदर मिळते. एवढंच नाही तर गुंतवणूकदारांना कंपाऊंडिंगचा लाभ देखील मिळतो आणि म्हणूनच ही योजना जास्तीत जास्त लोकप्रिय ठरली आहे.

अशा पद्धतीने फॉर्मुल्याचा वापर करा, कोटींच्या घरात पैसे जमा होतील :

1. प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपल्याजवळ कोटी रुपयांची रक्कम तयार व्हावी. परंतु यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुंतवणूक आणि मिळणारे व्याजदर. तुम्ही पीपीएफ खात्यामध्ये 15+5+5 या फॉर्म्युलाचा वापर करून भरपूर पैसे जमा करू शकता.

2. आपण या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेशन समजून घेऊया. तुम्हाला 15 वर्षांच्या कालावधीमध्ये प्रत्येक 1 वर्षाला 1.5 लाख रुपयांची रक्कम खात्यामध्ये गुंतवायची आहे. 15 वर्षांनंतर आणखीन पाच वर्षांसाठी गुंतवणूक सुरू ठेवायची आहे.

3. 5 वर्षा पूर्ण झाल्यानंतर आणखीन 5 वर्षांसाठी योजना वाढवायची आहे. म्हणजेच तुम्ही एकूण 25 वर्षे पीपीएफ खात्यात पैसे गुंतवता. म्हणजेच तुमची एकूण गुंतवणूक 37.5 लाख रुपये होईल.

4. ज्या व्यक्तीने पीपीएफ खात्यात पैसे गुंतवले आहे तर त्याला 7.1% परताव्यानंतर 65.58 रुपये व्याज स्वरूपी मिळतील. याचाच अर्थ असा की, व्याजाची रक्कम आणि पैसे गुंतवलेली एकूण रक्कम मिळून गुंतवणूकदाराच्या खात्यात 1 कोटींचा फंड तयार होईल.

5. 15 वर्षानंतर तुम्ही तुमच्या पीपीएफ खात्यातील पैसे काढून घेऊ शकता. समजा तुम्ही ते पैसे काढले नाही तर, वार्षिक दरानुसार तुम्हाला व्याजदर मैने सुरू राहील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | PPF Investment Formula Friday 17 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#PPF Investment Formula(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x