16 July 2020 12:08 AM
अँप डाउनलोड

मुंबईसह उपनगरांत मुसळधार पाऊस, सायनमध्ये पाणी तुंबलं नसून केवळ साचलं आहे

Mumbai, Rain, Heavy Rain, low tide High Tide, BMC, Shivsena

मुंबई : मागील काही दिवसांपासून उसंत घेणारा वरुणराजा काल रात्री पासून मुंबईमध्ये पुन्हा जोरदारपणे दाखल झाला आहे. काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे सकाळी कार्यालयांकडे निघालेल्या मुंबईकरांना अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुंबईत सकाळपासून ट्रॅफिकमुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. तसेच अनेक ठिकाणी आणि विशेष करून सखल भागात पाणी साचल्याने स्थानिक लोकांना देखील अनेक अडचणी येत आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

मुंबईसह उपनगरांत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत असून, अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. मुंबईच्या सायन येथील गांधीनगर मार्केट परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहनचालकांना पाण्यातून गाड्या चालवाव्या लागत आहेत. साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी करत आहेत.

महत्वाची सूचना: कोरोना आपत्तीत सतर्क राहणं कधीही चांगलं आणि त्यासाठीच आपत्कालीन परिस्थितीत सर्व माहिती देणारं अँप सोबत असणं देखील गरजेचं आहे. म्हणून आत्ताच डाउनलोड करा... महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड.

Download App Now
Download Corona Dashboard App

हॅशटॅग्स

#Mumbai(103)#Raining(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x