14 December 2024 7:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

भाजपमध्ये उद्रेक होणार? माजी मंत्री राम शिंदेंचा थेट चंद्रकांत पाटलांना लगावला टोला

former minister Ram Shinde, Chandrakant Patil

मुंबई, १४ मे: भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले. पक्षाने एकाच घरात किती जणांना उमेदवारी द्यायची, असा सवालही उपस्थित केला. त्याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांनीही उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगितले. त्यांनीही दु:ख व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

तसेच विनोद तावडे आणि बावनकुळे यांना देखील पक्षाने एकाबाजूला सारल्याने आम्ही पक्षात इतर जवाबदारी निभावू असं बोलण्यापलीकडे या नेत्यांकडे दुसरी प्रतिकिया शिल्लक नाही. त्यात कर्जत-जामखेडमध्ये पराभूत झालेले राम शिंदे देखील सध्या राजकीय अडचणीत असल्याचं पाहायला मिळतं. आ. रोहित पवार यांचा कर्जत-जामखेड मधील कामाचा आवाका आणि पक्षविस्तार पाहता राम शिंदे यांना दुसरा मतदारसंघ किंवा विधानपरिषदे शिवाय दुसरा पर्याय नसल्याने त्यांचं राजकीय भवितव्य टांगणीला लागलं आहे.

परिणामी ते देखील पक्षातील वरिष्ठांच्या एकाधिकारशाहीवर नाराज असल्याचं कळतं. राज्य भाजप साह्य मोजल्या ४-५ नेत्यांनी स्वतःच्या मुठीत ठेवून सर्व प्रतिस्पर्धी संपविण्याचे प्रकार राज्य भाजपमध्ये सुरु असल्याचं पाहायला मिळतं. राम शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी फेसबुक पोस्टचा आधार घेतला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका वक्तव्याचा आधार घेत टोला लगावला आहे. पंकजा मुंडेंमुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली, पण त्यांच्यासहित इतरांना मिळाली नाही याची खंत राम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

काय आहे राम शिंदे यांची फेसबुक पोस्ट?

“विधानपरिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘विधानपरिषदेसाठी नेते, इच्छूक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील,’ असे म्हटले होते.

त्या अनुषंगाने मा.पंकजाताई मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास ( त्यामुळे श्री रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली ) केला. जो मला आणि इतरांना जमला नाही,” असं राम शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

 

News English Summary: BJP leader Ram Shinde has relied on a Facebook post to express his displeasure. He has made a statement based on a statement made by BJP state president Chandrakant Patil through his Facebook post. Ram Shinde has lamented that Ramesh Karad got the nomination due to Pankaja Munde, but others including him did not get it.

News English Title: BJP leader and former minister Ram Shinde slams BJP state President Chandrakant Patil News Latest Updates.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x